भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 07:46 IST2025-10-14T07:43:51+5:302025-10-14T07:46:44+5:30

भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाला विराम देण्याचे श्रेय पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांना पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी दिले.

Donald Trump happy with those criticizing India praises Pakistan general again | भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं

भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पाकिस्तान लष्कराचे फिल्ड मार्शल असीम मुनीर यांचे कौतुक केले आहे. यामुळे अमेरिका आणि पाकिस्तानची जवळीक वाढत असल्याचे दिसत आहे. काल गाझा शांतता शिखर परिषदेत पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांनी भाषणात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा एकदा भारतासोबत झालेल्या युद्ध थांबवण्याचे श्रेय दिले. यावेळी ट्रम्प यांनी मुनीर यांचे कौतुक केले. विशेष म्हणजे असीम मुनीर या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते तरीही ट्रम्प यांनी कौतुक केले. 

उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू

गाझा शांतता शिखर परिषदेत अनेक प्रमुख जागतिक नेते उपस्थित होते. शरीफ देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते, पण मुनीर उपस्थित नव्हते. शरीफ यांना सभेला संबोधित करण्यासाठी आमंत्रित करताना ट्रम्प म्हणाले, "पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ, आणि मी म्हणेन, माझे आवडते पाकिस्तानचे फील्ड मार्शल, जे येथे नाहीत, परंतु पंतप्रधान येथे आहेत."

यावेळी ट्रम्प यांनी काही दिवसापूर्वी व्हाईट हाऊसमध्ये शरीफ आणि मुनीर यांची भेट घेतली. त्यादरम्यान त्यांनी पाकिस्तानी लष्करप्रमुखांचे कौतुकही केले होते.

पाकिस्तान ट्रम्प यांचे कौतुक करण्यात व्यस्त 

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या अथक प्रयत्नांमुळे पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित झाली आहे असे शरीफ म्हणाले. ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील वादासह सात वाद सोडवल्याचा दावा केला आहे. त्यांनी आता इस्रायल-गाझा संघर्ष जोडून ही संख्या आठ केली आहे.

१० मे रोजी ट्रम्प यांनी सोशल मीडियावर भारत आणि पाकिस्तान युद्ध अमेरिकेच्या मध्यस्थीने थांबवल्याचे जाहीर केले होते. 

Web Title : भारत के आलोचकों पर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाक जनरल की प्रशंसा

Web Summary : डोनाल्ड ट्रम्प ने पाक जनरल मुनीर की प्रशंसा की, जिससे अमेरिका-पाक संबंध मजबूत हुए। गाजा शांति शिखर सम्मेलन में शरीफ ने भारत-पाक विवाद सुलझाने का श्रेय ट्रम्प को दिया। ट्रम्प ने युद्ध रोकने का दावा किया।

Web Title : Trump Praises Pakistan General, Pleased with India Critics

Web Summary : Donald Trump praised Pakistan's General Munir, highlighting closer US-Pakistan ties. He credited himself for resolving India-Pakistan conflicts during a Gaza peace summit where Pakistan's PM Sharif spoke. Trump claimed his intervention stopped a potential war.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.