शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
4
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
5
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
6
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
7
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
8
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
9
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
10
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
11
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
12
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
13
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
14
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
15
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
16
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
17
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
18
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
19
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
20
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?

डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'गाझा' योजनेला पीएम मोदींचा पाठिंबा; अमेरिकेने म्हटले 'गेमचेंजर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 11:43 IST

Donald Trump Gaza Plan: गाझामध्ये शांतता प्रस्थापनेसाठी ट्रम्प यांच्या योजनेला जागतिक समर्थन मिळत आहे.

Donald Trump Gaza Plan: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझामध्ये शांतता प्रस्थापनेसाठी मांडलेल्या योजनेला जागतिक पातळीवर व्यापक समर्थन मिळत असून, व्हाईट हाऊसने या योजनेला दूरदर्शी व 'गेम चेंजर' म्हटले आहे. अरब देशांपासून ते पाश्चात्य राष्ट्रांपर्यंतचे नेते या योजनेला पाठिंबा देत असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्हाईट हाऊसकडून बुधवारी जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, ट्रम्प यांच्या योजनेमुळे वर्षानुवर्षे सुरू असलेल्या विनाशकारी संघर्षाला एक निर्णायक वळण मिळू शकते. या योजनेत तात्काळ युद्धविराम, सर्व बंधकांची सुरक्षित सुटका आणि सतत मानवी मदतीवर विशेष भर देण्यात आला आहे. अंतिम उद्दिष्ट गाझाला समृद्धी व स्थायी शांततेचे प्रतीक बनवणे आहे.

अमेरिकी प्रशासनाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिंब्याचा विशेष उल्लेख केला. मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट करून या उपक्रमाचे स्वागत करताना लिहिले होते की, "ही घोषणा पॅलेस्टाईन व इस्रायलच्या लोकांसाठी स्थायी शांतता, सुरक्षा व विकासाचा व्यवहार्य मार्ग दाखवते. सर्व संबंधित पक्ष या उपक्रमात सहभागी होतील अशी अपेक्षा आहे." 

या देशांचाही पाठिंबा

विशेष म्हणजे, सौदी अरेबिया, जॉर्डन, संयुक्त अरब अमिरात, इंडोनेशिया, पाकिस्तान, तुर्की, कतार आणि इजिप्तच्या परराष्ट्र मंत्र्यांनीही संयुक्त निवेदनाद्वारे या योजनेला पाठिंबा दिला आहे. ट्रम्प प्रशासनाचे मत आहे की, हा उपक्रम केवळ प्रादेशिक स्थैर्य वाढवणार नाही, तर जागतिक पातळीवरही सुरक्षा व स्थिरतेला बळकटी देईल. गाझा संघर्ष निराकरणासाठी ही योजना सकारात्मक संकेत देत असून सर्व पक्ष या उपक्रमात सहकार्य करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Trump's Gaza Plan Backed by Modi, US Calls it 'Gamechanger'

Web Summary : Trump's Gaza peace plan gains global support, hailed as a 'gamechanger'. Modi endorsed it, envisioning peace for Palestine and Israel. Arab nations also support the initiative aimed at ending conflict and fostering stability.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाIndiaभारतIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धNarendra Modiनरेंद्र मोदी