पत्रकार परिषदेदरम्यान ट्रम्प झोपी गेले; ‘स्लीपी डॉन’ नावाने सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 19:19 IST2025-11-10T19:18:07+5:302025-11-10T19:19:27+5:30
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पत्रकार परिषदेदरम्यान ट्रम्प झोपी गेले; ‘स्लीपी डॉन’ नावाने सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते व्हाइट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये प्रेस कॉन्फरन्सदरम्यान झोपताना दिसत आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर ‘स्लीपी डॉन’ या हॅशटॅगसह मीम्सचा पाऊस पडला आहे. कधी जो बायडनला ‘स्लीपी जो’ म्हणणाऱ्या ट्रम्पवर आता स्वतःच्या तब्येतीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
Poetic… Trump is slumped over asleep while Dr Oz touts obesity drugs to help sleep and dementia. pic.twitter.com/BWOywzFI4B
— Eric Feigl-Ding (@DrEricDing) November 7, 2025
ओव्हल ऑफिसमधील व्हिडिओ
मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना त्या वेळी घडली, जेव्हा ओव्हल ऑफिसमध्ये वजन कमी करणाऱ्या औषधांच्या किंमतींमध्ये कपात या विषयावर पत्रकार परिषद सुरू होती. कॅमेरे सुरू असतानाच ट्रम्प खुर्चीवर झोपी गेले. हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर ट्रम्प यांची जोरदार खिल्ली उडवली जात आहे. कॅलिफोर्नियाचे राज्यपाल गॅविन न्यूजम यांनी ट्रम्पचा फोटो शेअर करत “Dozy Don is back!” असे लिहिले.
‘स्लीपी डॉन’ मीम्सने भरले सोशल मीडिया
एक्स, इंस्टाग्राम आणि रेडिटसारख्या प्लॅटफॉर्मवर “#SleepyDon” हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. लोकांनी जो बायडनवर कधीकाळी ट्रम्पने केलेल्या “स्लीपी जो” टीकेची आठवण करून दिली आणि आता त्यांच्यावरच व्यंग केला जातोय.
DOZY DON IS BACK! pic.twitter.com/TQHaMi9YaF
— Governor Newsom Press Office (@GovPressOffice) November 7, 2025
व्हाइट हाऊसचा डॅमेज कंट्रोल
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर व्हाइट हाऊसकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी म्हटले की, “हा व्हिडिओ चुकीच्या संदर्भात पसरवला जातोय. राष्ट्राध्यक्ष काही क्षणांसाठी डोळे मिटले होते, झोपले नव्हते.”
ट्रम्प यांच्या तब्येतीबाबत प्रश्न
या घटनेनंतर ट्रम्प यांच्या आरोग्य स्थितीबाबत शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. विशेषतः त्यांचे समर्थक आणि विरोधक दोघेही आता त्यांच्या वैद्यकीय तपासणीबाबत प्रश्न विचारत आहेत. कधी जो बायडन यांच्या वयावर टीका करणाऱ्या ट्रम्प यांच्यावरच अशा प्रकारची टीका होत आहे.