Donald Trump: "...तर इराणचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" ट्रम्प असं का म्हणाले? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 18:46 IST2026-01-21T18:45:26+5:302026-01-21T18:46:52+5:30

Donald Trump News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक इशारा दिला असून, हत्येच्या कटात सहभाग आढळल्यास देशाला पूर्णपणे नष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. याला प्रत्युत्तर देताना इराणनेही अमेरिकेचे जग पेटवून देण्याची धमकी दिली आहे.

Donald Trump Directs Advisors to Destroy Iran if Involved in Any Attack; Tehran Vows to Set World on Fire | Donald Trump: "...तर इराणचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" ट्रम्प असं का म्हणाले? 

Donald Trump: "...तर इराणचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" ट्रम्प असं का म्हणाले? 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराण यांच्यातील वाद आता युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. "जर माझ्या हत्येच्या कटात इराणचा सहभाग आढळला, तर तो देश जगाच्या नकाशातून पुसून टाकण्यात येईल", असा इशारा ट्रम्प यांनी दिला. एका टीव्ही मुलाखतीदरम्यान ट्रम्प यांनी हा खळबळजनक खुलासा केला असून, त्यांनी आपल्या सल्लागारांनाही यासंदर्भात स्पष्ट निर्देश दिले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले की, जर इराणने त्यांच्याविरुद्ध कोणताही कट रचला, तर त्याला इतकी मोठी किंमत मोजावी लागेल की, त्यातून काहीही शिल्लक राहणार नाही. ट्रम्प यांनी आपल्या लष्करी आणि धोरणात्मक सल्लागारांना सूचना दिली आहे की, अशी कोणतीही घटना घडल्यास इराणला जगाच्या नकाशातून पुसून टाकले जावे. ट्रम्प यांच्या या विधानामुळे जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे.

ट्रम्प यांच्या धमकीला इराणनेही तितक्याच जशास तसे उत्तर दिले आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा तेहरानने दिला आहे. "जर कोणी आमच्या नेत्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही केवळ त्यांचा हातच कापणार नाही, तर त्यांचे जग पेटवून देऊ," असे इराणी सशस्त्र दलाचे प्रवक्ते अबोलफझल शेखरची यांनी ठणकावून सांगितले.

अमेरिका आणि इराणमधील संबंध बिघडले असून आंतरराष्ट्रीय युद्धाचा धोका वाढला आहे. ट्रम्प यांनी इराणवर जास्तीत जास्त दबाव टाकण्याचे धोरण अवलंबले आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, आपल्या जीवाला धोका निर्माण झाल्यास ते कोणत्याही मोठ्या लष्करी कारवाईसाठी मागे हटणार नाहीत. त्यांच्या या भूमिकेमुळे राजनैतिक संवादाचे सर्व मार्ग सध्या बंद झाल्याचे दिसत आहे.

Web Title : ट्रंप की चेतावनी: ईरान साजिश में शामिल तो मिटा दिया जाएगा

Web Summary : ट्रंप ने ईरान को धमकी दी है कि अगर वह उनके खिलाफ साजिश में शामिल पाया गया तो उसे मिटा दिया जाएगा। ईरान ने जवाबी कार्रवाई करते हुए अपने नेता के खिलाफ किसी भी कार्रवाई पर गंभीर परिणाम की चेतावनी दी है। तनाव बढ़ने से अंतरराष्ट्रीय युद्ध की आशंका बढ़ गई है।

Web Title : Trump Warns: Iran Will Be Erased If Involved in Plot

Web Summary : Trump threatens Iran's erasure if linked to a plot against him. Iran retaliated, warning of severe consequences for any action against their leader. Tensions escalate, raising international war concerns.