डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब कारभार! स्वतःला घोषित केलं व्हेनेझुएलाचे 'कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 09:26 IST2026-01-12T09:24:36+5:302026-01-12T09:26:22+5:30
ट्रुथ सोशल पोस्टने उडवून दिली खळबळ

डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब कारभार! स्वतःला घोषित केलं व्हेनेझुएलाचे 'कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष'
Donald Trump Acting President of Venezuela: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, ट्रुथ सोशलवर एक पोस्ट शेअर करून आंतरराष्ट्रीय जगतात खळबळ उडवून दिली आहे. ट्रम्पच्या अधिकृत फोटोसह पोस्टमध्ये असे म्हटले आहे की ते सध्या व्हेनेझुएलाचे 'कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष' आहेत. ट्रम्प यांनी अमेरिकेची निवडणूक जिंकून २० जानेवारी २०२५ ला दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. ते अमेरिकेचे ४७वे राष्ट्राध्यक्ष आहेत. तशातच आता त्यांनी अमेरिकेने कब्जा केलेल्या व्हेनेझुएलाचे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष म्हणून स्वत:ला घोषित केले आहे.

महत्त्वाची गोष्ट अशी की, ही पोस्ट अशा वेळी आली आहे जेव्हा अमेरिकेने व्हेनेझुएलावर मोठ्या प्रमाणात लष्करी कारवाई सुरू केली आहे. या कारवाईदरम्यान, व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांना अमेरिकेत नेण्यात आले आणि आता त्यांना नार्को-दहशतवादाच्या आरोपाखाली न्यूयॉर्कमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे आणि न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागत आहे.
( @realDonaldTrump - Truth Social Post )
— Donald J Trump Posts TruthSocial (@TruthTrumpPost) January 12, 2026
( Donald J. Trump - Jan 11 2026, 8:23 PM ET ) pic.twitter.com/ueMAyaXVqK
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की सत्तेचे सुरक्षित, न्याय्य आणि वाजवी हस्तांतरण होईपर्यंत अमेरिका व्हेनेझुएलातील सत्ता नियंत्रित करेल. त्यांचा दावा आहे की अमेरिका व्हेनेझुएलाच्या लोकांच्या हितासाठी ही जबाबदारी पार पाडत आहे. यादरम्यान, व्हेनेझुएलाच्या उपराष्ट्रपती आणि तेलमंत्री डेल्सी रॉड्रिग्ज यांनी देशाच्या अंतरिम राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे, परंतु ट्रम्प यांच्या दाव्यामुळे या अंतरिम सरकारच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी असेही म्हटले आहे की व्हेनेझुएलाचे अंतरिम सरकार अमेरिकेला ३० ते ५० दशलक्ष बॅरल उच्च दर्जाचे प्रतिबंधित तेल पुरवेल, जे बाजारभावाने विकले जाईल. त्यातून मिळणारे उत्पन्न अमेरिका आणि व्हेनेझुएला दोघांच्याही फायद्यासाठी वापरले जाईल. त्यांनी अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांना ही योजना त्वरित अंमलात आणण्याचे निर्देश दिले आहेत.