SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 11:41 IST2026-04-08T11:40:29+5:302026-04-08T11:41:58+5:30

याच कारणावरून सध्या जगभरात ट्रम्प यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर ताशेरे ओढले जात आहेत

Donald Trump both sons trump junior and erik trump are making huge money from the Iran-US war | SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!

SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!

इराण आणि इस्रायल-अमेरिका युद्धाच्या झळा आता संपूर्ण जगालाच बसायला लागल्या आहेत. याचाच परिणाम म्हणून सगळ्याच गोष्टी महागल्या आहेत आणि सर्वसामान्य माणसाचं जीवन दुष्कर बनू लागलं आहे. मात्र, अशाही परिस्थितीत अनेक जण ‘संधी’ शोधताहेत आणि त्यातून आपलं उखळ पांढरं करून घेताहेत...

‘नफा’ कमावणं हेच ज्यांंचं जीवितध्येय आहे, अशा काही अप्पलपोट्या धनिकांचं आणि व्यावसायिकांचं सोडा, पण त्यात खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं कुटुंबही सामील असावं? - याच कारणावरून सध्या जगभरात ट्रम्प यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर ताशेरे ओढले जात आहेत. अमेरिकेच्या विरोधी पक्षांनीही ‘मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाण्याच्या’ या प्रवृत्तीचा कठोर निषेध केला आहे. 

सध्या सुरू असलेल्या युद्धामुळे ड्रोन आणि अँटी-ड्रोन सिस्टिमची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. युद्धासाठी इराण स्वस्त ड्रोनचा वापर करत आहे, तर अमेरिका आणि त्याचे सहयोगी महागड्या मिसाइल सिस्टिमनं त्यांना पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे इराणला या युद्धासाठी जेवढा खर्च येतोय, त्याच्या कितीतरी जास्त पट खर्च अमेरिका आणि इस्रायल यांना करावा लागतो आहे. यातच अनेकांनी व्यवसायाची आणि नफ्याची संधी शोधली. त्यामुळे स्वस्त आणि प्रभावी अँटी-ड्रोन सिस्टिम बनविणाऱ्या नव्या-जुन्या कंपन्या यासाठी मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत. यातलीच एक कंपनी आहे पॉवरस (Powerus). अलीकडेच ‘गार्डियन-१’ नावाचं इंटरसेप्टर त्यांनी लॉन्च केलं आहे. विशेषतः आत्मघाती ड्रोन (उदाहरणार्थ इराणचं शाहेद-१३६) पाडण्यासाठी ते बनविण्यात आलं आहे.

अमेरिकेत याच ड्रोन स्टार्टअपवरून सध्या वाद निर्माण झाले आहेत. कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची दोन्ही मुलं, एरिक ट्रम्प आणि डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर या स्टार्टअपशी जोडलेले आहेत. रिपोर्टनुसार, फ्लोरिडाची ही कंपनी मध्यपूर्वेतल्या अनेक देशांना आपली ड्रोन सिस्टिम विकण्याचा आणि त्यातून प्रचंड नफा कमावण्याचा प्रयत्न करते आहे. 

फेब्रुवारीच्या शेवटी ट्रम्प यांच्या या दोन्ही मुलांची कंपनीचे ‘सल्लागार’ म्हणून नेमणूक करण्यात आली. हाच तो काळ, ज्यावेळी अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर हल्ला केला. ट्रम्प यांची ही दोन्ही मुलं म्हणजेच हे दोन्ही भाऊ ड्रोन क्षेत्रात सक्रिय गुंतवणूकदार आहेत आणि ‘अमेरिकन व्हेन्चर्स’सारख्या फंडशी जोडलेले आहेत. या फंडने ड्रोन कंपन्यांमध्ये सुमारे एक अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. 

माजी अमेरिकन नैतिकता अधिकारी रिचर्ड पेंटर यांनी यावर तीव्र आक्षेप घेत आरोप केला आहे की, राष्ट्राध्यक्षांच्या कुटुंबातील लोकच युद्धातून फायदा कमवत आहेत. कदाचित पहिल्यांदाच एखाद्या राष्ट्राध्यक्षांच्या कुटुंबानं युद्धातून इतका पैसा कमावला असेल! आपल्याला अमेरिकेचं समर्थन मिळावं यासाठी राष्ट्राध्यक्षांच्या कुटुंबाशी संबंधित कंपनीकडूनच खरेदी करावी याचा मोठा दबावही आखाती देशांवर नक्कीच येईल. ट्रम्प यांची मुलं अशा वेळी आणि असा व्यवसाय करीत आहेत, जेव्हा त्यांच्या वडिलांनीच युद्धाची परिस्थिती निर्माण केली. डेमोक्रॅटिक सिनेटर एलिझाबेथ वॉरेन यांनी थेट संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनाच पत्र लिहून विचारलं आहे की, या कंपन्यांना सरकारी कंत्राटं योग्य पद्धतीनं दिली जात आहेत का? की राष्ट्राध्यक्षांच्या कुटुंबाला मुद्दाम फायदा करून दिला जात आहे?

Web Title: Donald Trump both sons trump junior and erik trump are making huge money from the Iran-US war