donald trump administration imposes visa curbs on pregnant women to target birth tourism | गर्भवती महिलांना अमेरिकेचा व्हिसा नाही, ट्रम्प प्रशासनाचा निर्णय

गर्भवती महिलांना अमेरिकेचा व्हिसा नाही, ट्रम्प प्रशासनाचा निर्णय

ठळक मुद्देअमेरिकेमध्ये अन्य देशातून येणाऱ्या गर्भवती महिलांना आता अमेरिकेचा व्हिसा देण्यात येणार नसल्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतला आहे. 'बर्थ टूरिझम' रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती.गर्भवती महिलांना प्रवासी व्हिसावर अमेरिकेत प्रवास करणं आता कठीण होणार.

वॉशिंग्टन - अमेरिकेमध्ये अन्य देशातून येणाऱ्या गर्भवती महिलांना आता अमेरिकेचा व्हिसा देण्यात येणार नसल्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतला आहे. 'बर्थ टूरिझम' रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. ट्रम्प प्रशासनाच्या नव्या नियमांनुसार गर्भवती महिलांना अमेरिकेत जायचं असल्यास त्यांना अमेरिकेत जाण्याचं कारण काऊन्सिलर अधिकाऱ्याला पटवून द्यावं लागणार आहे. म्हणजेच गर्भवती महिलांना प्रवासी व्हिसावर अमेरिकेत प्रवास करणं आता कठीण होणार आहे.

रशिया आणि चीनसह विविध देशांमधून अनेक महिला आपल्या मुलांना जन्म देण्यासाठी अमेरिकेत येत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. ट्रम्प प्रशासनाने बर्थ टूरिझमने होणाऱ्या गुन्हेगारी कारवायांना प्रतिबंध करण्याचा यात समावेश असल्याचं म्हटलं आहे. पर्यटनाशी संबंधित असलेल्या अनेक कंपन्या अशा लोकांची मदत करतात. हॉटेलमध्ये राहण्यासोबतच वैद्यकीय सेवा आणि इतर सुविधा ते देत असतात. मात्र यासाठी तब्बल 80 हजार डॉलर्स घेतले जातात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या 

Ind vs NZ, 1st T20 : पहिल्या सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर विजय

Maharashtra Bandh Live: भाजपाने विरोध करुनही महाराष्ट्र बंद यशस्वी - आंबेडकर

'मोटा भाई-छोटा भाईच्या तोंडी हिटलरची भाषा', मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

'पोहे खाण्याच्या पद्धतीवरून बांगलादेशींना ओळखलं', भाजपा नेत्याचं अजब विधान

Corona Virus : चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे 25 जणांचा मृत्यू, 830 जणांना संसर्ग

 

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: donald trump administration imposes visa curbs on pregnant women to target birth tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.