रेल्वे ट्रॅकवर अडकला कुत्र्याचा पट्टा, तेवढ्यात समोरुन आली ट्रेन अन्; पाहा थरकाप उडवणारा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 13:07 IST2021-10-24T13:06:21+5:302021-10-24T13:07:15+5:30
कुत्र्याचा पट्टा पटरीमध्ये अडकल्यामुळे त्याला पळता येत नव्हते.

रेल्वे ट्रॅकवर अडकला कुत्र्याचा पट्टा, तेवढ्यात समोरुन आली ट्रेन अन्; पाहा थरकाप उडवणारा VIDEO
सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. प्रत्येक व्हायरल व्हिडिओची काही विशेषतः असते. यात माणुसकी दाखवणारेही अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाच प्रकारचा एक व्हडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही मोठा धक्का बसेल.
व्हायरल होणार व्हिडिओ एका कुत्र्याचा आहे. तुम्ही म्हणाल, यात काय विशेष ? तर तो कुत्रा एका रेल्वे पटरीमध्ये अडकला होता. तेवढ्यात एक भरधाव वेगाने ट्रेन येत होती. त्या कुत्र्याचा पट्टा पटरीमध्ये अडकल्यामुळे त्याला पळताही येत नव्हते. तेवढ्यात समोरुन एक माणूस धाव आला आणी त्याने आपला जीव धोक्यात घालून त्या कुत्र्याला वाचवले.
व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते की एक माणूस धावत येतोय आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ट्रॅकवर अडकलेल्या कुत्र्याला वाचवताना दिसतोय. धक्कादायक बाब म्हणजे, फक्त एका सेकंदाचा उशीर झाला असता, तर कुत्रा आणि तो माणूस ट्रेनखाली आले असते. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर 'official_viralclips' नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर आतापर्यंत अनेक कमेंट्स येत आहेत. तसेच, त्या व्यक्तीच्या धाडसाचे मोठे कौतुक होत आहे.