१ ग्रॅम युरेनियमची 'पॉवर' किती असते माहित्येय? केवढा मोठा 'धमाका' होऊ शकतो वाचा! ट्रम्प यांच्या रडारवर ४०० किलो युरेनियम का हे कळेल...

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: March 30, 2026 17:30 IST2026-03-30T17:28:10+5:302026-03-30T17:30:16+5:30

इराण या युरेनियमचा वापर अण्वस्त्रे बनवण्यासाठी करेल, अशी भीती अमेरिकेला वाटते. "इराणला कोणत्याही परिस्थितीत अण्वस्त्रे मिळवू देणार नाही," अशी ट्रम्प यांची भूमिका आहे. यामुळेच, इराणच्या अणुकेंद्रांमध्ये दडवून ठेवलेले हे ४०० किलो युरेनियम बाहेर काढण्यासाठी अमेरिका एका मोठ्या मिलिट्री ऑपरेशनची आखणी करत असल्याचे वृत्त आहे. तर जाणून घेऊयात युरेनियमच्या शक्तीसंदर्भात... 

Do you know how much power 1 gram of uranium has Read how big an explosion it can cause Find out why 400 kg of uranium is on Donald Trumps radar Iran war | १ ग्रॅम युरेनियमची 'पॉवर' किती असते माहित्येय? केवढा मोठा 'धमाका' होऊ शकतो वाचा! ट्रम्प यांच्या रडारवर ४०० किलो युरेनियम का हे कळेल...

१ ग्रॅम युरेनियमची 'पॉवर' किती असते माहित्येय? केवढा मोठा 'धमाका' होऊ शकतो वाचा! ट्रम्प यांच्या रडारवर ४०० किलो युरेनियम का हे कळेल...

श्रीकृष्ण न. अंकुश -

अमेरिका-इस्रायल आणि इराणयुद्ध सुरू होऊन एक महिना उलटून गेला आहे. मात्र अद्यापही युद्धाची धग कायम आहे. हे युद्ध केव्हा थांबेल? हे सांगणे अवघड. आता अमेरिकन लष्कर इराणवर जमीनी हल्ला करू शकते, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे. इराणकडे असलेल्या ४०० किलोग्रॅम संवर्धित (Enriched) युरेनियमवर ताबा मिळवण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प केव्हाही आपल्या लष्कराला आदेश देऊ शकतात, असेही बोलले जात आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारचा अधिकृत निर्णय झालेला नाही. 

काय आहे अमेरिकेचा प्लॅन...? -
इराण या युरेनियमचा वापर अण्वस्त्रे बनवण्यासाठी करेल, अशी भीती अमेरिकेला वाटते. "इराणला कोणत्याही परिस्थितीत अण्वस्त्रे मिळवू देणार नाही," अशी ट्रम्प यांची भूमिका आहे. यामुळेच, इराणच्या अणुकेंद्रांमध्ये दडवून ठेवलेले हे ४०० किलो युरेनियम बाहेर काढण्यासाठी अमेरिका एका मोठ्या मिलिट्री ऑपरेशनची आखणी करत असल्याचे वृत्त आहे. तर जाणून घेऊयात युरेनियमच्या शक्तीसंदर्भात... 

१ ग्रॅम युरेनियममधून निर्माण होणारी ऊर्जा थक्क करणारी? -
खरेतर, अगदी एका ग्रॅम युरेनियममध्ये साठलेली ऊर्जा ही कोळसा किंवा तेलासारख्या पारंपारिक इंधनांच्या तुलनेत खूप अधिक असते. अगदी विज्ञानाच्याच भाषेतच सांगायचे तर, एक ग्रॅम युरेनियममधून मिळणारी ऊर्जा, ही केवळ रासायनिक प्रक्रिया नसून ती अणुविखंडन (Nuclear Fission) प्रक्रियेतून निर्माण होते. एक ग्रॅम युरेनियम पूर्णपणे विखंडित झाल्यास, त्यातून निर्माण होणारी ऊर्जा ही थक्क करणारी असते.

१ ग्रॅम युरेनियममधून किती ऊर्जा मिळू शकते? -
- कोळशाशी तुलना केल्यास, १ ग्रॅम युरेनियममधून मिळणारी ऊर्जा ही साधारणपणे ३ टन (३००० किलो) उच्च दर्जाच्या कोळशापासून मिळणाऱ्या ऊर्जेएवढी असते.
- तेलाशी तुलना केल्यास, हे प्रमाण सुमारे २३०० लिटर तेलाच्या ऊर्जेएवढे आहे.
- गणिती भाषेत सांगायचे झाल्यास, एक ग्रॅम युरेनियमच्या विखंडनातून सुमारे ८.२ x १० चा १० वा घात ज्यूल्स एवढी ऊर्जा मुक्त होते.

महत्त्वाचे म्हणजे, केवळ एक ग्रॅम युरेनियमचा 'अणूबाँब' बनवता येत नाही. अणूबाँबचा स्फोट होण्यासाठी 'क्रिटिकल मास' (Critical Mass) नावाच्या किमान वजनाची आवश्यकता असते, जे युरेनियमसाठी साधारणपणे १५ ते ५२ किलोच्या दरम्यान असू शकते.

किती तीव्र असू शकतो एका ग्रॅम युरेनियमचा स्फोट? -
TNT शी तुलना करता, १ ग्रॅम युरेनियमच्या विखंडनातून मिळणारी ऊर्जा ही सुमारे २० टन TNT (एक शक्तिशाली स्फोटक) च्या स्फोटाच्या ऊर्जेएवढी असते.

किती मोठा असू शकतो विनाश? -  
२० टन TNT चा स्फोट एखाद्या मोठ्या इमारतीला अथवा परिसराला जमीनदोस्त करण्यासाठी पुरेसा असतो. मात्र, अणूबाँबमध्ये ही प्रक्रिया साखळी पद्धतीने (Chain Reaction) घडते, यामुळे तीव्रता कैक पटीने वाढते. महत्वाचे म्हणजे, अणू उर्जेचा स्फोट केवळ उष्णता आणि प्रकाश निर्माण करत नाही, तर तो घातक किरणोत्सारही सोडतो, जो अनेक दशके संबंधित परिसरात राहू शकतो.

थोडक्यात सांगायचे तर, १ ग्रॅम युरेनियम शांततापूर्ण कामासाठी, उदाहरणार्थ वीज निर्मितीसाठी वापरल्यास, ते एका कुटुंबाला कित्येक वर्ष पुरेल इतकी वीज देऊ शकेल, पण त्याचा स्फोट झाल्यास तो एका मोठ्या इमारतीलाही नष्ट करण्याची क्षमता ठेवते.


 

Web Title : यूरेनियम को समझें: शक्ति, संभावित धमाका और ट्रम्प की चिंताएं

Web Summary : एक ग्राम यूरेनियम में तीन टन कोयले के बराबर ऊर्जा होती है। अकेला बम बनाने के लिए पर्याप्त नहीं, लेकिन ईरान की परमाणु महत्वाकांक्षाओं के कारण 400 किग्रा अमेरिका को चिंतित करता है। एक ग्राम का विखंडन 20 टन टीएनटी के बराबर है, जो इमारतों को नष्ट कर सकता है और विकिरण छोड़ सकता है। शांति से इस्तेमाल करने पर, यह सालों तक घरों को बिजली दे सकता है।

Web Title : Understanding Uranium: Power, Potential Blast, and Trump's Concerns Explained

Web Summary : One gram of uranium packs immense energy, equaling three tons of coal. While not bomb-ready alone, 400kg worries the US due to Iran's nuclear ambitions. A gram's fission mirrors 20 tons of TNT, devastating buildings and releasing radiation. Used peacefully, it powers homes for years.