अॅपलचे फोन वापरू नका, अन्यथा...! फेसबुकची कर्मचाऱ्यांना तंबी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 22:40 IST2018-11-15T22:38:35+5:302018-11-15T22:40:54+5:30
सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने आपल्या कर्मचाऱ्यांना अॅपलचा आयफोन वापरावर बंदी आणली आहे.

अॅपलचे फोन वापरू नका, अन्यथा...! फेसबुकची कर्मचाऱ्यांना तंबी
सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने आपल्या कर्मचाऱ्यांना अॅपलचा आयफोन वापरावर बंदी आणली आहे. हे कर्मचारी आता अँड्रॉईडचा मोबाईल वापरत आहेत. हे आदेश खुद्द फेसबुकचा मालक मार्क झकरबर्गने दिले असून अॅपलच्या सीईओनी फेसबुकवर टीका केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
न्यूयॉर्क टाइम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे. अॅपलच्या सीईओ टीम कूक यांनी MSNBC मध्ये एका मुलाखतीदरम्यान फेसबुकवर टीका केली होती. केम्ब्रिज अॅनालिटीका प्रकरणी कूक यांनी प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी आम्ही असतो तर अशी परिस्थिती होऊच दिली नसती. खासगी आयुष्यात अॅपल कधीच घुसली नाही. खासगीपणा हा मानवी अधिकार आहे आणि स्वातंत्र्यही. फेसबुक युजर्सच्या माहितीद्वारे पैसा कमावते. अॅपल असे कधीच करत नाही.
टीम कूक यांच्या या वक्तव्यानंतर मार्क झकरबर्ग नाराज असून त्यांनी थेट आपल्या कर्मचाऱ्यांनाच लक्ष्य केले आहे. अॅपलचा फोन वापरायचा असेल तर नोकरी सोडा, अन्यथा अँड्रॉइडचा फोन वापरण्याची तंबीच त्यांनी कर्मचाऱ्यांना दिली आहे. तसेच अॅपलपेक्षा अँड्रॉइडवर फेसबुकची अॅप वापरणाऱ्यांची संख्याही जादा असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, या पार्श्वभुमीवर या अमेरिकेच्या दोन मोठ्या कंपन्यांमधील वाद आणखी काही महिने सुरु राहण्याची शक्यता आहे.