शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

माघार घेऊ नका - बगदादीचा दहशतवाद्यांना आदेश

By admin | Updated: November 3, 2016 12:51 IST

चहुबाजूंनी कोंडी झालेली असताना बगदादीने आपल्या दहशतवाद्यांना माघार घेऊ नका, चिवटपणे लढा द्या, असा संदेश दिला आहे.

ऑनलाइन लोकमत 

बगदादा, दि. 3 - इराकमधील मोसूल शहरात इसिससविरुद्ध सुरू असलेली लढाई आता शेवट्च्या टप्प्यात पोहोचली असून, इसिसचा म्होरक्या असलेल्या अबू बक्र अल बगदादीला इराकी फौजांनी घेरले आहे. चहुबाजूंनी कोंडी झालेली असतानाच बगदादीने एक ध्वनिफित प्रसारित करून आपल्या दहशतवाद्यांना  माघार घेऊ नका, चिवटपणे लढा द्या, असा संदेश दिला आहे.  
बगदादीचा हा संदेश इसिसशी संबंधित असलेल्या अल फुरकान मीडियाने प्रसारित केला आहे. "माघार घेऊ नका. आत्मसन्मानाने तुमच्या भूमीवर टिकून राहा. असे करणे हे हजारवेळा लाजिरवाण्यापद्धतीने माघार घेण्यापेक्षा सोपे असते. निनेवाहमधील नागरिकांनी, विशेषत: दहशतवाद्यांनी स्वत:मध्ये कोणत्याही प्रकारची दुर्बलता न आणता शत्रूचा सामना करावा." असे बगदादीने आपल्या संदेशात म्हटले आहे. जवळपास वर्षभरानंतर बगदादीकडून आलेला हा पहिलाच संदेश आहे. 
(इसिसचा म्होरक्या अबू अल बगदादीवर जेवणातून विषप्रयोग)
आपल्या क्रूर कारवायांनी जगभरात दहशत पसरवणाऱ्या इसिसने इराक आणि सिरियात आपले बस्तान बसवले होते. मात्र इराकी फौजांनी अमेरिकन सैन्याच्या मदतीने आयएसविरोधात जोरदार आघाडी उघडून त्यांना इराकच्या बहुतांश भागातून हुसकावून लावले होते. दरम्यान, इसिसचा बालेकिल्ला असलेल्या मोसूल शहरावरही इराकी फौजांनी चाल करत या शहराला वेढा घातला असून, इराकी फौजा आणि इसिसच्या दहशतवाद्यांमध्ये तुंबळ लढाई सुरू आहे. त्यामुळे  गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेला बगदादीचा क्रूर खेळ संपुष्टात येण्याची शक्यता आहे.