शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

सिंधूचे पाणी अन्यत्र वळविणे हे युद्धसदृशच, पाकचा कांगावा; भारतीयांचा विमान प्रवास महागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 07:30 IST

वाघा सीमा तत्काळ बंद करण्याचा व या मार्गाने वाहतूक बंद करण्यात आली आहे

इस्लामाबाद : सिंधू करारानुसार मिळणारे पाणी अन्यत्र वळविण्याचा भारताचा कोणताही प्रयत्न हा युद्धसदृश कृती मानला जाईल, असा कांगावा  पाकिस्तानने गुरुवारी केला. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या निर्णयांना प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने भारताशी व्यापार, सिमला करारासह अन्य द्विपक्षीय करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला. तसेच भारताच्या विमानांना पाकिस्तानी हवाई हद्द बंद केली आहे.

पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीनंतर हे निर्णय जाहीर करण्यात आले. वाघा सीमा तत्काळ बंद करण्याचा व या मार्गाने वाहतूक बंद करण्यात आली आहे. जे भारतीय वैध मार्गाने पाकिस्तानात आले आहेत, त्यांनी ३० एप्रिलपूर्वी परत जावे असा आदेश देण्यात आल्याचे पाकिस्तानने एका निवेदनात म्हटले आहे.

पुढे काय?अमेरिका, ब्रिटन, युरोप, मध्य पूर्वेकडील देशांचा प्रवास महागणारदिल्लीसह उत्तर भारतातील शहरांमधून होणाऱ्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांना आता नियोजित ठिकाणी पोहोचण्यास अधिक वेळ लागणार आहे. परिणाम म्हणून तिकिटांचे दरही वाढण्याची शक्यता आहे. उत्तर अमेरिका, ब्रिटन, युरोप आणि मध्य पूर्वेकडील देशांमध्ये जाताना आता विमानांना दुसऱ्या मार्गाने अधिक अंतर प्रवास करून जावे लागणार आहे.

एअर इंडिया आणि इंडिगो या कंपन्यांनी सांगितले की, त्यांच्या काही आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम झाला आहे. एअर इंडियाने स्पष्ट केले की उड्डाणे आता पर्यायी मार्गाने जाणार आहेत. एअर इंडिया एक्स्प्रेस आणि स्पाईसजेट कंपन्याना अरबी समुद्रावरून जाणारा तसेच अधिक दूर असलेल्या पर्यायी मार्गाचा वापरकरावा लागेल. त्यामुळे खर्चही वाढणार आहे. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला