शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
3
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
4
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
5
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
6
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
7
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
8
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
9
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
10
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
11
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
12
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
13
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
14
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
15
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
16
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
17
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
18
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
19
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
20
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा

२८ हजार कर्मचाऱ्यांना डिस्ने बसविणार घरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2020 2:29 AM

कंपनीने म्हटले की, आम्ही थिम पार्कमधील कर्मचाºयांची संख्या २८ हजारांनी कमी करीत आहोत. ही संख्या एकूण कर्मचाºयांच्या तुलनेत एकचतुर्थांश आहे

कॅलिफोर्निया : अमेरिकेतील प्रसिद्ध मनोरंजन कंपनी डिस्ने आपल्या थिम पार्कमधील २८ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे. कोरोना विषाणूच्या साथीमुळे व्यवसायावर प्रतिकूल परिणाम झाल्यामुळे डिस्नेने हा निर्णय घेतला आहे. डिस्ने पार्कचे चेअरमन जोश डीआमरो यांनी सांगितले की, हा निर्णय हृदयाला घरे पाडणारा असला तरी कोविड-१९मुळे व्यवसायावर जो दीर्घकालीन परिणाम झाला आहे, त्यामुळे आमच्यासमोर हाच एक व्यवहार्य पर्याय उपलब्ध आहे. कोविड-१९मुळे शारीरिक अंतराचे नियम पाळणे बंधनकारक आहे. त्याचा परिणाम म्हणून पार्कची क्षमता घटली आहे. साथ किती काळ चालेल हे अनिश्चित असल्यामुळे लगेचच क्षमता वाढण्याची शक्यता नाही. अशा परिस्थितीत कर्मचारी संख्या कमी करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय कंपनीसमोर उपलब्ध नाही.

कंपनीने म्हटले की, आम्ही थिम पार्कमधील कर्मचाºयांची संख्या २८ हजारांनी कमी करीत आहोत. ही संख्या एकूण कर्मचाºयांच्या तुलनेत एकचतुर्थांश आहे. साथीच्या आधी कॅलिफोर्निया आणि फ्लोरिडा येथील डिस्ने पार्कमधील कर्मचाºयांची संख्या १,१०,००० होती. रोजगार कपातीनंतर ती ८२ हजार होणार आहे.डीआमरो यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कॅलिफोर्निया सरकार बंधने उठवायला तयार नसल्यामुळे या राज्यातील डिस्नेलँड पार्क बंदच आहे. तो कधी उघडेल हे सांगणे अवघड आहे. अशा परिस्थितीत कर्मचारी कपातीचा कटु निर्णय कंपनीला घ्यावा लागला आहे.

टॅग्स :Employeeकर्मचारी