भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 16:31 IST2025-09-06T16:30:08+5:302025-09-06T16:31:21+5:30
Baba Vanga Predictions : गेल्या काही महिन्यांपासून बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरताना दिसत आहेत.

भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
गेल्या काही महिन्यांपासून बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरताना दिसत आहेत. बाबा वेंगा यांचे खरे नाव व्हँजेलिया पांडेवा गुश्तेरोवा होते. त्या त्यांच्या अचूक भविष्यवाण्यांसाठी ओळखल्या जातात. बल्गेरियाच्या बाबा वेंगा यांच्या अनेक भविष्यवाण्या, जसे की ९/११ हल्ला, कोविड-१९ महामारी आणि २००४ ची त्सुनामी, खऱ्या ठरल्या आहेत. २०२५ साठी त्यांच्या भविष्यवाण्या काय सांगतात आणि त्या खऱ्या होण्याच्या मार्गावर आहेत का ते जाणून घेऊया...
बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्या काय?
बाबा वेंगा यांनी २०२५ मध्ये आर्थिक अस्थिरता आणि नैसर्गिक आपत्तींची भविष्यवाणी केली होती. यामध्ये तीव्र दुष्काळ, पूर, भूकंप आणि असामान्य तापमान वाढ यांचा समावेश आहे. अलिकडेच अफगाणिस्तानात झालेल्या भूकंपात ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. रशियामध्ये तीव्र भूकंप झाला. मार्चमध्ये म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपात शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. याशिवाय, त्यांनी अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर ज्वालामुखीचा उद्रेक आणि भूकंपाचा इशारा दिला होता.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाची भीती
बाबा वेंगा यांनी २०२५ मध्ये मोठ्या युद्धाची शक्यता वर्तवली होती, त्यांनी या वर्षी अनेक देश उद्ध्वस्त होऊ शकतात अशी भीती व्यक्त केली होती. मात्र, त्यांनी कोणत्याही देशाचे नाव घेतले नव्हते. परंतु याआधी त्यांनी केलेली अनेक भाकिते खरी ठरली आहेत. त्यामुळे बाबा वेंगा यांच्या भाकितात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाचाच उल्लेख असू शकतो, असे मानले जात होते.
अमेरिकेतील आर्थिक आणि नैसर्गिक संकट
बाबा वेंगा यांनी २०२५ मध्ये आर्थिक गोंधळ आणि नैसर्गिक आपत्तींचा इशारा दिला होता. या वर्षी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांसोबत टॅरिफ वॉर सुरू केले आहे. ज्यामुळे आर्थिक जागतिक बाजारपेठेत विनाश होऊ शकतो. हे पाऊल बाबा वेंगा यांची आर्थिक संकटाची भविष्यवाणी खरी ठरत असल्याचे दिसते. याशिवाय, त्यांनी अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर ज्वालामुखीचा उद्रेक आणि भूकंपाचा इशारा दिला होता. रशियातील कामचटका येथे नुकत्याच झालेल्या ८.८ रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे अमेरिका आणि जपानच्या किनारी भागात त्सुनामीचा धोका वाढला आहे.
बाबा वेंगा यांनी जपानबद्दल केलेल्या भविष्यवाण्या आणि 'जपानी बाबा वेंगा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रियो तात्सुकी यांच्या भविष्यवाण्याही चर्चेत आहेत. तात्सुकीने २०२५ मध्ये जपानमध्ये मोठ्या त्सुनामीचा इशारा दिला होता, जो २०११ च्या तोहोकू आपत्तीपेक्षा तिप्पट धोकादायक असू शकतो.
भारतातील नैसर्गिक आपत्ती
बाबा वेंगा यांचे भाकीत भारतातही खरे ठरताना दिसत आहे. अलिकडच्या काळात विक्रमी मान्सून, मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलन झाले आहे. त्यांनी २०२५ मध्ये भयानक भूकंप आणि पुराचा इशारा दिला होता. पंजाबमध्ये गेल्या काही दशकांतील सर्वात मोठ्या पुरामुळे लाखो लोक प्रभावित झाले आहेत. नद्या दुथडी भरून वाहत आहेत, कालवे फुटले आहेत आणि हजारो हेक्टर शेती नष्ट झाली आहे. उत्तराखंड, दिल्ली आणि हरियाणामध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत बाबा वेंगा यांचे भाकीत खरे ठरताना दिसत आहे.