पाकिस्तानने तालिबानसमोर टेकले गुडघे? स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आता 'सौदी'चाच आधार; परराष्ट्रमंत्र्यांची रियाधमध्ये धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 12:31 IST2026-02-27T12:21:09+5:302026-02-27T12:31:26+5:30

पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी सौदी परराष्ट्रमंत्र्यांना पहिला फोन केला. त्यांनी तणाव कमी करण्यासाठी चर्चेचे आवाहन केले. गुरुवारी अफगाणिस्तानने पाकिस्तानचे अनेक भाग ताब्यात घेतल्याने पाकिस्तानने उघड युद्ध घोषित केले.

Did Pakistan bow its knees before the Taliban? Now it is relying on Saudi Arabia to save its own life; Foreign Minister rushes to Riyadh | पाकिस्तानने तालिबानसमोर टेकले गुडघे? स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आता 'सौदी'चाच आधार; परराष्ट्रमंत्र्यांची रियाधमध्ये धाव

पाकिस्तानने तालिबानसमोर टेकले गुडघे? स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आता 'सौदी'चाच आधार; परराष्ट्रमंत्र्यांची रियाधमध्ये धाव

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू झाला आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले केले आहेत. दरम्यान, आता तालिबानशी झालेल्या शत्रुत्वाच्या उद्रेकानंतर, पाकिस्ताननेसौदी अरेबियाशी संपर्क साधला आहे. पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री इशाक दार यांनी सौदी परराष्ट्र मंत्र्यांशी फोनवर चर्चा केली. सौदी परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, पाकिस्तानने या प्रदेशातील तणाव कमी करण्याच्या मार्गांवर चर्चा केली आहे. सौदी अरेबिया आणि पाकिस्तान हे संरक्षण क्षेत्रातील सहयोगी देखील आहेत आणि हा फोन कॉल महत्त्वपूर्ण मानला जातो.

अमेरिका फुल टेन्शनमध्ये...! अफगाणिस्तानने अमेरिकेच्याच शस्त्रांनी अमेरिकेचे लढाऊ विमान पाडले, पाकिस्तानने पुन्हा एकदा नाक कापले

सौदी परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, काबूलमधील हवाई हल्ल्यानंतर, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी त्यांचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल बिन रहमान यांना फोन केला. विशेष म्हणजे, इशाक दार सध्या सौदी अरेबियात आहेत. ते इस्लामिक सहकार्य संघटनेच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी जेद्दाह येथे आहेत.

पाकिस्तानने सौदी अरेबियाशी संपर्क साधला

सौदी अरेबिया हा पाकिस्तानचा संरक्षण भागीदार आहे. दोघांमध्ये गेल्या वर्षी एक करार झाला. त्यानुसार, एका देशावर हल्ला करणे दुसऱ्या देशावर हल्ला मानला जाईल. जर पाकिस्तानने तालिबानशी लढत राहिल्यास सौदी अरेबियालाही हस्तक्षेप करावा लागू शकतो. या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानने सौदी अरेबियाला पहिला फोन केला आहे.

सौदी अरेबिया पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात शांतता करार घडवून आणण्यात बराच काळ मध्यस्थी करत आहे. सौदी अरेबियाच्या पुढाकारानेच अफगाणिस्तानने अलीकडेच तीन पाकिस्तानी सैनिकांना सोडले. पाकिस्तानने केलेल्या युद्धबंदी उल्लंघनामुळे युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानला सौदी अरेबियाशी करार करण्याची आशा आहे.

सौदी अरेबिया आणि तालिबानमधील व्यापार अंदाजे ४० मिलियन डॉलर्सचा आहे. शिवाय, २०२१ ते २०२४ पर्यंत, सौदी अरेबियाने मानवतावादी मदतीच्या नावाखाली तालिबानला ७० दशलक्ष डॉलर्सची मदत केली.

Web Title : तालिबान के साथ बढ़ते तनाव के बीच पाकिस्तान ने सऊदी से मदद मांगी

Web Summary : तालिबान के साथ बढ़ते तनाव के बीच, पाकिस्तान ने सऊदी अरब से सहायता मांगी है। दोनों देशों के बीच रक्षा साझेदारी को देखते हुए क्षेत्रीय तनाव को कम करने पर चर्चा हुई। सऊदी अरब ने ऐतिहासिक रूप से पाकिस्तान और अफगानिस्तान के बीच मध्यस्थता की है और तालिबान को सहायता प्रदान की है।

Web Title : Pakistan Seeks Saudi Help Amidst Rising Tension with Taliban

Web Summary : Amid escalating tensions with the Taliban, Pakistan has reached out to Saudi Arabia for assistance. Discussions focused on de-escalating regional tensions, given the defense partnership between the two nations. Saudi Arabia has historically mediated between Pakistan and Afghanistan and has provided aid to the Taliban.