‘हमासचा खात्मा करण्याची इच्छा, पण अयशस्वी ठरले’; मौलाना अरशद मदनी म्हणाले, गाझातील एक लाख शहिदांनी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 12:32 IST2025-06-07T12:31:30+5:302025-06-07T12:32:37+5:30
...याचा अर्थ, गाझाच्या विनाशात आणि विध्वंसात अमेरिकेचा हात आहे आणि पॅलेस्टाईनमधील हत्याकांडासाठी जबाबदार असलेल्या भागीदारांमध्ये अमेरिकेचा पहिला क्रमांकावर आहे. गाझाला मानवमुक्त करून तेथे ज्यू लोकांना वसवण्याची अमेरिकेची इच्छा आहे.

‘हमासचा खात्मा करण्याची इच्छा, पण अयशस्वी ठरले’; मौलाना अरशद मदनी म्हणाले, गाझातील एक लाख शहिदांनी...
गाझा युद्धामुळे झालेल्या विध्वंसाच्या मुद्द्यावरून संयुक्त राष्ट्रांमध्ये सादर करण्या आलेल्या ठरावाला अमेरिकेने व्हेटो केल्याने जमियत उलेमा-ए-हिंदने नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात जमियत उलेमा-ए-हिंदने शुक्रवारी (६ जून २०२५) एक निवेदन जारी करून गाझामध्ये होत असलेल्या विनाशासाठी आणि विध्वंसासाठी अमेरिकेला जबाबदार ठरवले आहे. यासंदर्भात बोलताना, जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना अर्शद मदनी म्हणाले, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावावर व्हेटो केल्याने, अमेरिका मानवतेचा सर्वात मोठा शत्रू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अमेरिकेमुळे मंजुर होऊ शकला नाही UNSC चा प्रस्ताव -
जमीयत उलमा ए हिंदने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, इस्रायल आणि हमास यांच्यात तत्काळ, व्यापक आणि कायमस्वरूपीची युद्धबंदी, गाझामध्ये मानवतावादी मदत त्वरित उपलब्ध होणे आणि मूलभूत हक्क बहाल करण्यासंदर्भात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) 15 पैकी 14 सदस्यांकडून एक महत्वपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र, 15 पैकी 14 सदस्यांनी समर्थनार्थ मतदान केले मात्र, अमेरिकेने व्हीटो पॉवर वापरल्याने सुरक्षा परिषदेत हा प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही.
इस्रायलकडून गाझामध्ये पॅलेस्टिनी नागरिकांवर होत असलेली बॉम्बिंग आणि अत्याचारांविरुद्ध कायमस्वरूपी युद्धबंदीच्या प्रस्तावावर अमेरिकेने दिलेल्या व्हेटोवर जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना अर्शद मदनी यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले, "१४ देशांनी हा प्रस्ताव मांडला होता, परंतु अमेरिकेने त्याला पाठिंबा दिला नाही. याचा अर्थ, गाझाच्या विनाशात आणि विध्वंसात अमेरिकेचा हात आहे आणि पॅलेस्टाईनमधील हत्याकांडासाठी जबाबदार असलेल्या भागीदारांमध्ये अमेरिकेचा पहिला क्रमांकावर आहे. गाझाला मानवमुक्त करून तेथे ज्यू लोकांना वसवण्याची अमेरिकेची इच्छा आहे. मात्र, अल्लाहची इच्छा असेल तर हे कधीही शक्य होणार नाही."
हमासचे कौतुक करत मौलाना मदनी म्हणाले, "अमेरिका, इस्रायल आणि हमासचा संपूर्ण खात्मा करण्याची इच्छा बाळगून असणारे देश, अद्यापही अपयशी ठरले आहेत. ही परिस्थिती कायम ठेवण्यासाठी गाझातील सुमारे एक लाख शहीदांनी निःसंशयपणे आपले रक्त सांडले आहे. जमियत उलेमा-ए-हिंद पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्यसैनिकांप्रति मनापासून सहवेदना व्यक्त करते आणि त्यांच्या स्वातंत्र्याच्या मागणीला पूर्ण पाठिंबा देते."