शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

सौदीत मिनी स्कर्ट घालून फिरणाऱ्या मुलीला शिक्षा देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 15:33 IST

एक तरूणी मिनी स्कर्टमध्ये सौदीच्या रस्त्यावर फिरताना दिसली आहे.

ऑनलाइन लोकमत

रियाध, दि. 18-  मुलींनी शॉर्क स्कर्ट किंवा शॉर्ट ड्रेस घालायला आपल्याकडे बंदी नाही. आणि असे कपडे घालून जर एखादी मुलगी फिरली तरी काही आश्चर्य नसतं. पण सौदी अरेबियासारख्या देशात शॉर्ट कपडे घालून फिरणं एखाद्या गुन्ह्यासारखं मानलं जातं. वेस्टर्न  कपडे वापरल्याने किंवा हिजाब परिधान केला नाही, अशा अनेक कारणांमुळे महिलांना तिथे याआधीही शिक्षा झाल्या आहेत. पण हे सगळे नियम मोडत एक तरूणी मिनी स्कर्टमध्ये सौदीच्या रस्त्यावर फिरताना दिसली आहे. मिनी स्कर्ट आणि क्रॉप टॉप घालून सौदीच्या रस्त्यावर फिरतानाचा त्या तरूणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘खुलूद’ या नावाने ती तरूणी सध्या सौदी अरेबियात प्रसिद्ध झाली आहे. सौदीच्या राजधानीपासून काही किलोमीटर दूर असणाऱ्या एका प्राचीन किल्ल्यावर ती क्रॉप टॉप आणि मिनी स्कर्ट घालून फिरत होती. या महिलेला पकडून तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जाते आहे. सौदीतील स्थानिकांनी त्या तरूणीच्या या वर्तनाला विरोध करायला सुरूवात केली आहे. ही तरूणी स्थानिक नसून परदेशातील असल्याचाही अंदाज वर्तविला जातो आहे. सौदीतील काही लोकांनी या तरूणीला शिक्षा देण्याची मागणी केली आहे तर दुसरीकडे सोशल मीडियावर तिला समर्थनही दिलं जातं आहे. तसंच सौदी अरेबियात महिलांच्या कपडे वापरावर असलेले नियम बदलण्याचीही मागणी करत आहेत. 
 
मिनी स्कर्ट घालून फिरणाऱ्या त्या तरूणीचा व्हिडिओ सुरूवातील स्नॅपचॅटवर पोस्ट करण्यात आला होता. ती मुलगी सौदीतील ऑशेगर गावात असलेल्या एका किल्ल्यावर फिरत होती. हे गाव राजधानी रियाध पासून 200 किलोमीटर अंतरावर आहे. सौदी मीडियाने सोमवारी ही बातमी प्रसारीत केली होती. तरूणी फिरत असलेला गाव पाश्चिमात्य संस्कृतीच्या विरोधात असून तेथे पारंपारिक पद्धती अजूनही वापरल्या जातात. सौदी प्रशासनाने या तरूणीच्या विरोधात कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. या तरूणीने सौदीच्या ड्रेस कोड संदर्भातील नियमांचं उल्लंघन केलं आहे, असं प्रशासनाचं म्हणणं आहे. यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्यात आली असून, ही समिती पुढील तपास करते आहे. सौदीमध्ये हिजाब, आयबा परिधान करण्याची महिलांना सक्ती आहे. हे नियम मोडणाऱ्या महिलेला शिक्षा दिली जाते. पण इथे येणारे परदेशी पर्यटक मात्र ड्रेसकोडबाबतचे हे नियम पाळत नाही. 
आणखी वाचा
 

पाकिस्तानाच्या पत्राची गरज नाही, सुषमा स्वराजांनी दिला "ओसामा"ला व्हिसा

 

VIDEO - बलुचिस्तान पाठोपाठ सिंधमध्येही स्वातंत्र्यासाठी आंदोलन

भारत-चीन युद्धाची खोटी बातमी प्रसारित करतंय पाकिस्तानी चॅनेल

मिनी स्कर्ट घालून सौदीत फिरणाऱ्या तरूणीचा व्हिडीओवरून सोशल मीडियावरही वाद सुरू झाला आहे. सौदीतील महिला कोणते कपडे परिधान करतील हे कायद्यात निश्चित होतं. इथे महिलांसाठी एक ड्रेसकोड निश्चित आहे.  सौदीतील महिला लांब आणि ढीले तसंच पूर्ण शरीर झाकणारे कपडे घालतात. तसा नियमच करण्यात आला आहे. म्हणून सौदीच्या एका गावात मिनी स्कर्ट घालून फिरणाऱ्या मुलीवर टीका होते आहे.