शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : इटलीतील मृतांमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्या अधिक, हे आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 13:48 IST

इटलीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा आता चार हजारच्याही पुढे गेला आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे येथे मृतांमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्या अधिक आहे.

ठळक मुद्देकोरोनामुळे मरणारांची सर्वाधिक संख्या इटलीतइटलीमध्ये 50 हून अधिक वय असलेले पुरुष अधिक संक्रमितधूम्रपानामुळे इन्फ्लूएंझाचा धोका अधिक 

रोम : जगभरातच कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस जगभरातील मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. या व्हायरचा इटलीला सर्वाधिक फटका बसला आहे. मृतांच्या आकडेवारीच्या बाबतीत इटलीनेचीनलाही मागे सोडले आहे. ताज्या आकडेवारीनुसार इटलीत एका दिवसात तब्बल 627 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 5986 नवे रुग्ण समोर आले  आहेत.

इटलीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा आता चार हजारच्याही पुढे गेला आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे येथे मृतांमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्या अधिक आहे.

काही तज्ज्ञ मंडळींच्या म्हणण्याप्रमाणे, महिलांच्या तुलनेत पुरुषांना कोरोना होण्याची शक्यता, जेवढी वृद्धांना असते तेवढीच असते. काही दिवसांपूर्वी जवळपास अशीच अकडेवारी चीनमध्येही दिसून आली होते. येथेही कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण अधिक होते. रोममधील एका संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 25,058 कोरोनाग्रस्तांमध्ये 5 टक्के महिलां रुग्णांच्या तुलनेत 8 टक्के पुरुष रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जॉन्स हॉपकिन्स यूनिव्हर्सिटीच्या प्राध्यापक साबरा क्लेन यांनी म्हटले आहे, की महिलांच्या तुलनेत पुरुषांना कोरोनाची लागण होणाऱ्या शक्यता जेवढी वृद्धांना असते तेवढीच असते. लोकांमध्ये हा फरक  जैविक अथवा व्यवहारिक असू शकतो. एका अभ्यासानुसार पुरुषांच्या तुलनेत महिलांची रोगप्रतिकारक शक्ती अधिक असते. तसेच पुरुषांमध्ये अधिक धुम्रपान आणि हात धुन्याची सवय कमी, हे आहे.

कोरोना व्हायरससंदर्भात बोलताना अमेरिकेतील डॉक्टर डेबोरा बीरक्स म्हणाले, इटलीमध्ये मरणारांची संख्या महिलांच्या तुलनेत दुप्पट आहे. विशेषतः येथे 50 हून अधिक वय असलेले पुरुष अधिक संक्रमित आहेत. महिलांमध्ये असणारा सेक्स हार्मोन एस्ट्रोजनदेखील रोगप्रतिकार शक्तीला मदत करतो. X क्रोमोसोमलाही इम्यूनिटी जीन मानले जाते. जो महिलांमध्ये दोन तर पुरुषांमध्ये केवळ एकच असतो. यापूर्वीही काही हेल्थ एक्सपर्ट्सनी इशारा दिला होता, की धुम्रपान अथवा ई-सिगरेट कोरोना व्हायरसचे संक्रमण अधिक धोकादाय बनवू शकतो. 

चीनमधील एका मेडिकल जर्नलमध्ये आलेल्या एका लेखात म्हणण्यात आले आहे, की 78 कोरोनाग्रस्त धुम्रपानकरत होते. यासर्वांना निमोनिया झाला होता.

चॅपल हिल येथील बायोलॉजीचे प्राध्यापक रॉबर्ट यांनी म्हटले  आहे, की 'धूम्रपानामुळे इन्फ्लूएंझाचा धोका अधिक वाढतो. जे लोक धुम्रपान करतात त्यांची रोग प्रतिकारक शक्ती काही प्रमाणात कमी होते. त्यांचे फुफूसदेखील चांगले नसते. जे लोक अधिक धुम्रपान करतात, त्यांना कोरोनाची लागण होण्याची अधिक भीती आहे. हा व्हायरस एकदाका शरिरात गेता तर त्याचे अनेक गंभीर परिणाम होतात.

कोरोना व्हायरसने जगभरात रौद्र रुप धारण केले असून १७९ देशांना विळखा घातला आहे. आतापर्यंत 10049 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अडीज लाखांच्या आसपास रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, इटलीमध्ये कोरोना विषाणूने आता चीनपेक्षा भयानक रूप धारण केले आहे. कोरोना विषाणूमुळे इटलीमध्ये दररोज शेकडो लोकांचा मृत्यू होत आहे. दोन दिवसांपूर्वीच इटलीमध्ये एका दिवसात 475 लोकांचा मृत्यू झाला होता. तर आज इटलीमध्ये दिवसभरात 627 जणांचा मृत्यू झाला आहे. आता इटलीमध्ये सुमारे चार हजार जणांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याItalyइटलीchinaचीनIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्रdoctorडॉक्टरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस