विमानाच्या 'लॅंडिंग गिअर'मध्ये लपलेल्या व्यक्तीचा मृत्यू; विमानाच्या तपासणीदरम्यान आढळला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 13:01 IST2025-09-30T13:01:25+5:302025-09-30T13:01:46+5:30
Dead Body in Plane Landing Gear : यापूर्वी भारतातही अशाच प्रकारची घटना घडली होती.

विमानाच्या 'लॅंडिंग गिअर'मध्ये लपलेल्या व्यक्तीचा मृत्यू; विमानाच्या तपासणीदरम्यान आढळला मृतदेह
Dead Body in Plane Landing Gear : अमेरिकेतून धक्कादायक घटना समोर आली आहे. नॉर्थ कॅरोलिनातील एका विमानतळावर युरोपहून आलेल्या विमानाच्या लॅंडिंग गिअर मध्ये एका व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. विमानाच्या नियमित तपासणीदरम्यान हा मृतदेह आढळल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
विमान कंपनी आणि पोलिसांनी मृत व्यक्तीची ओळख अद्याप जाहीर केलेली नाही. तसेच हे विमान नेमके कोणत्या युरोपीय देशातून आले होते, याचीही माहिती दिलेली नाही. तज्ञांच्या मते विमानाच्या लॅंडिंग गिअरमध्ये लपून बसणाऱ्या बहुतांश लोकांचा मृत्यू होतो. विमान उंचीवर पोहोचते, तेव्हा प्रचंड थंडी, कमी ऑक्सिजन आणि दाबातील बदलामुळे मृत्यूचा धोका आहे.
यापूर्वीही अशा घटना
जानेवारी 2024: फ्लोरिडातील फोर्ट लॉडरडेल-हॉलीवूड आंतरराष्ट्रीय विमानतळावर जेटब्लू विमानाच्या लॅंडिंग गिअर कम्पार्टमेंट मध्ये दोन मृतदेह आढळले होते. हे विमान न्यूयॉर्कहून फ्लोरिडाला आले होते.
डिसेंबर 2023: शिकागोहून माउई येथे आलेल्या युनायटेड एअरलाइन्सच्या विमानाच्या व्हील वेल भागातही एका व्यक्तीचा मृतदेह सापडला होता.
भारतातील घटना
अशाच प्रकारची घटना अलीकडे भारतातही घडली. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अफगाणिस्तानातील 13 वर्षीय मुलगा विमानाच्या लॅंडिंग गिअर मध्ये लपून आला होता. विमान उतरल्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्याला पाहिले आणि CISF च्या ताब्यात दिले. चौकशीत मुलाने सांगितले की, तो फक्त कुतूहलापोटी काबुल विमानतळावरुन विमानात चढला होता. शेवटी त्याला परत अफगाणिस्तानला पाठवण्यात आले.