शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

दलाई लामा ग्रॅमी पुरस्काराचे मानकरी; कोणत्या श्रेणीत मिळवला सन्मान? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 13:22 IST

Spiritual Leader Dalai Lama: तिबेटी बौद्ध आध्यात्मिक गुरू दलाई लामा यांचा ग्रॅमी पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.

Grammy Award 2026 Winner Dalai Lama: संगीत विश्वातील अत्यंत प्रतिष्ठित सन्मानांपैकी एक असलेल्या ग्रॅमी पुरस्कारांची घोषणा झाली आहे. दरवर्षीप्रमाणे, यंदाही भारत दावेदार होता, परंतु एकही ग्रॅमी पुरस्कार जिंकता आला नाही. मात्र, या वर्षी 90 वर्षीय आध्यात्मिक गुरू दलाई लामा यांनी ग्रॅमी पुरस्कार मिळवला आहे. त्यांना एका अतिशय खास श्रेणीत ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

कोणत्या श्रेणीत पुरस्कार? 

अनेकांना माहिती असेल की, दलाई लामा यांचे मनोरंजन क्षेत्राशी खोलवरचे नाते आहे. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. आता, त्यांना संगीत उद्योगातील एका प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दलाई लामा यांना 68 व्या ग्रॅमी पुरस्कारांमध्ये त्यांच्या "मेडिटेशन: द रिफ्लेक्शन्स ऑफ हिज हॉलिनेस द दलाई लामा" या अल्बमसाठी हा सन्मान मिळाला आहे. नोबेल शांतता पुरस्कारासह जगभरातील अनेक सन्मानांनी गौरवण्यात आलेल्या दलाई लामा यांच्या यादीत आता ग्रॅमी अवॉर्डचीही भर पडली आहे.

दलाई लामा यांचे मनोरंजनविश्वाशीही जुने नाते आहे.

1997 मध्ये मार्टिन स्कॉर्सेसी दिग्दर्शित ‘Kundun’ चित्रपटात त्यांच्या बालपणाची कथा मांडण्यात आली होती. या चित्रपटाला ऑस्करचे 4 नामांकन मिळाले होते. त्याच वर्षी ब्रॅड पिटचा ‘Seven Years in Tibet’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्यात बॉलिवूड अभिनेता डॅनी डेन्झोंगपा यांचीही भूमिका होती. 2014 मध्ये ‘Dalai Lama Awakening’ ही डॉक्युमेंट्री लोकप्रिय ठरली. तर, 2024 मध्ये ‘Wisdom of Happiness’ ही डॉक्युमेंट्री प्रदर्शित झाली होती, ज्यात स्वतः 14वे दलाई लामा होते.

ग्रॅमी 2026 मध्ये भारताची निराशा...

या वर्षी पंडित रविशंकर यांची मुलगी अनुष्का शंकर हिला त्यांच्या "डेब्रेक" या गाण्यासाठी ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. मात्र, पुरस्कार मिळू शकला नाही. यापूर्वी तिला विविध श्रेणींमध्ये 11 वेळा नामांकन मिळाले आहे. शंकर महादेवन यांचा फ्यूजन बँड शक्ती, ज्यामध्ये सिद्धांत भाटिया यांचा समावेश होता, यालाही नामांकन मिळाले होते. याशिवाय, भारतीय संगीतातील योगदानाबद्दल संगीतकार चारू सुरी यांनाही ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. मात्र, यावेळी भारताला निराशेचा सामना करावा लागला. 

आंतरराष्ट्रीय कलाकारांची बाजी

यंदाच्या ग्रॅमीमध्ये केंड्रिक लॅमर यांना 9 श्रेणींमध्ये नामांकन मिळाले, त्यापैकी 3 पुरस्कार त्यांनी जिंकले. तर, लेडी गागा 7 नामांकनांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या. 

English
हिंदी सारांश
Web Title : Dalai Lama Wins Grammy Award; Category Revealed. India Disappointed.

Web Summary : Dalai Lama won a Grammy for his album, "Meditation: The Reflections..." in spoken word category. India faced disappointment despite nominations for Anushka Shankar and Shakti. Kendrick Lamar and Lady Gaga dominated the awards.
टॅग्स :Grammy Awardsग्रॅमी पुरस्कारDalai Lamaदलाई लामा