शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

दोन मुलांच्या वडिलांकडून कमी झाले नाही वजन, मग असे बनवले 6 पॅक अ‍ॅब्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 20:06 IST

डॅनियल यांची पत्नी गेल्या काही वर्षांपासून आपली सुंदरता कायम ठेवण्यासाठी कॉस्मेटिक ट्रिटमेन्ट घेत आहे. डॅनियलदेखील वाढते वय आणि आपल्या वजनासंदर्भात प्रचंड विचार करत होते.

ठळक मुद्देवाढत्या वयाबरोबरच अनेकांचे वजन वाढते आणि चेहऱ्यावर सुरकुत्याही पडतात.सिक्स पॅक बनवण्यासाठी इंग्लंडमधील एका व्यक्तीने एक वेगळीच पद्धत वापरली आहे.ही व्यक्ती 39 वर्षांची असून त्यांना दोन मुले आहेत.

वाढत्या वयाबरोबरच अनेकांचे वजन वाढते आणि चेहऱ्यावर सुरकुत्याही पडतात. मात्र, बरेच लोक स्वतःला फिट आणि तरुण ठेवण्यासाठी अनेक प्रकारच्या प्रोडक्ट्सचा वापर करतात. अनेक लोक जीममध्ये तासंतास घाम गाळतात. तर अनेक जण डायटवर लक्ष केंद्रित करतात. मात्र, इंग्लंडमधील एका व्यक्तीने एक वेगळीच पद्धत वापरली आहे. या व्यक्तीने सर्जरी करण्याचा निर्णय घेतला आणि रात्रीतून आपल्या मोठ्या पोटाला  सिक्स अ‍ॅब्समध्ये रुपांतरीत केले. या व्यक्तीचे नाव डॅनियल असे आहे. ते 39 वर्षांचे असून त्यांना दोन मुले आहेत. त्यांनी वजन कमी करण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र, आता ते ओळखायलाही येत नाहीत.

खर्च केले 14 लाखहून अधिक - ‘डेली मेल’ने दिलेल्या वृत्तानुसार, डॅनियल इंग्लंडच्या वेस्टन-सुपर-मेर येथे राहतात. त्यांनी यासाठी Vaser liposuction वर 19,600 डॉलर (जवळपास 14 लाख 67 हजार रुपये) खर्च केले आहेत. या पद्धतीने शरिरातील काही निवडक मसल्स ग्रुप्समधून फॅट काढून ते आकर्षक केले जातात. 

परफेक्ट दिसण्याची होती इच्छा! -डॅनियल यांची पत्नी गेल्या काही वर्षांपासून आपली सुंदरता कायम ठेवण्यासाठी कॉस्मेटिक ट्रिटमेन्ट घेत आहे. डॅनियलदेखील वाढते वय आणि आपल्या वजनासंदर्भात प्रचंड विचार करत होते. त्यांनी स्वतःला शारीरिक दृष्या परफेक्ट ठेवण्यासाठी Vaser liposuction चा आधार घेण्याचे ठरवले. त्यांचा एक मुलगा 12 वर्षांचा तर दुसरा 20 वर्षांचा आहे.

डॅनियल यांनी डेलीमेलला दिलेल्या माहितीनुसार, ‘मी फिट राहण्यासाठी आठवड्यातून तीन-चार दिवस जिमला जात होतो. याच बरोबर वजन कमी करण्यासाठी मी विविध प्रकारचे डायटही केले आणि काही अंशी वजनही कमी झाले. मात्र, मला हवा तसा परिणाम झाला नाही'. यानंतर ते लंडन येथील ‘क्लिनिक वेसर’ येथे गेले आणि कॉस्मेटिक सर्जन डॉ. ग्रँट हेमलेट यांना भेटले. सर्जरीपूर्वी डॉक्टरांनी डॅनियल यांना या सर्जरीसंदर्भात सर्व गोष्टी समजावून सांगितल्या. 

आता कुणी म्हणणारही नाही, की त्यांना दोन मुले असतील -डॅनियल यांनी सांगितले, की ‘मला दुपारी 12:30 वाजता ऑपरेशनसाठी नेण्यात आले. मात्र, प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच मला जाग आली. तीही अ‍ॅब्ससह. सुरुवातीला वेदनांचा सामना करण्यासाठी मला दोन दिवसांची औषधे दिली आणि एका आठवड्यानंतर मला बरे वाटू लागले. डॅनियल सांगतात, की या प्रक्रियेने आयुष्यच बदलले. ते आजही आठवड्यातून तीन दिवस जीमला जातात. मात्र, आता पूर्वीपेक्षाही अधिक आत्मविश्वास वाटतो, असे ते सांगतात.

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus News: लोकांना संक्रमित करण्यासाठी अमेरिका तयार करतोय नवा कोरोना व्हायरस!

CoronaVirusVaccine : रशियन कोरोना लसीची अमेरिकेने उडवली खिल्ली, म्हणाले - माकडा लायकही नाही!

CoronaVaccine: पश्चिमेकडील देशांना रशियाचं थेट प्रत्युत्तर; सांगितलं, 'या'मुळे खास आहे Sputnik V लस

CoronaVirus vaccine News: फक्त 18 ते 60 वर्षांच्या आतील लोकांनाच दिली जाणार रशियन कोरोना लस, हे आहे मोठं कारण

CoronaVaccine: रशियन कोरोना लसीला जगभरातून जबरदस्त मागणी, 20 देशांकडून मिळाली 1 अब्ज डोसची ऑर्डर

टॅग्स :bodybuildingशरीरसौष्ठवEnglandइंग्लंडenglishइंग्रजी