सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 22:38 IST2025-06-16T22:37:22+5:302025-06-16T22:38:35+5:30

सायप्रसच्या (Cyprus) खासदाराचा पंतप्रधान मोदींबद्दलचा हा आदर भारताच्या खोलवर रुजलेल्या सांस्कृतिक संबंधांचे दर्शन घडवतो...

Cyprus woman MP lawmaker michaela kythreoti mhlapa touches Pm narendra Modi feet during welcome ceremony PM places hands on her head and blesses her | सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी सायप्रसचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडॉलिडेस यांच्यासोबत सेंटर ऑफ निकोसिया येथे पोहोचले. येथे पंतप्रधान मोदींप्रती आदर व्यक्त करत सायप्रसच्या महिला खासदाराने पंतप्रधानचे चरयण स्पर्श केले. यावेळचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्य निकोसिया परिषदेच्या सदस्य मिकेला किथ्रेओटी म्लापा पंतप्रधान मोदींचे चरणस्पपर्श करून पारंपरिक पद्धतीने त्याचे स्वागत करताना दिसत आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींनीही अत्यंत विनंम्रपणे त्यांच्या अभिवादनाचा स्वीकार केला. त्यांनी महिला खासदाराच्या डोक्यावर हात ठेवत त्यांना आशीर्वाद दिला.

पंतप्रधान मोदी 'या' तीन देशांच्या चार दिवसीय दौऱ्यावर -
सायप्रसच्या खासदाराचा पंतप्रधान मोदींबद्दलचा हा आदर भारताच्या खोलवर रुजलेल्या सांस्कृतिक संबंधांचे दर्शन घडवतो. हे ऐतिहासिक केंद्र जुन्या निकोसियाचा भाग आहे. जे किल्ले, पारंपारिक वास्तुकला आणि बाजारपेठांसाठी प्रसिद्ध आहे. सायप्रसचा दौरा संपवून पंतप्रधान मोदी सोमवारी जी-७ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी कॅनडाला रवाना झाले. दरम्यान, त्यांनी सायप्रसचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडौलिड्स यांच्याशी विस्तृत चर्चा केली. दोन्ही देशांमधील संबंधांना चालना देण्यासाठी अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. मोदी सायप्रस, कॅनडा आणि क्रोएशिया या तीन देशांच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.

पंतप्रधान मोदी कॅनाडा दौऱ्यावर -
कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी त्यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात रात्री कॅलगरी येथे पोहोचतील, ते तेथे कनानस्किसमधील जी-७ शिखर परिषदेत सहभागी होतील. गेल्या दशकात पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच कॅनडा दौरा आहे. पंतप्रधान मोदी सलग सहाव्यांदा जी-७ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी १६-१७ जून रोजी कनानस्किस परिषदेत सहभागी होत आहेत. 

Web Title: Cyprus woman MP lawmaker michaela kythreoti mhlapa touches Pm narendra Modi feet during welcome ceremony PM places hands on her head and blesses her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.