जपानवर सायबर हल्ला, विमानांच्या उड्डाणांना उशीर, तिकीट विक्री बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 10:39 IST2024-12-26T10:37:14+5:302024-12-26T10:39:27+5:30
जपानची दुसरी मोठी एअर लाईन कंपनी जपान एअर लाइन्सवर गुरुवारी सायबर हल्ला झाला आहे. या हल्ल्यामुळे कंपनीची इंटर्नल आणि एक्सटर्नल सिस्टीमवर परिणाम झाला आहे.

जपानवर सायबर हल्ला, विमानांच्या उड्डाणांना उशीर, तिकीट विक्री बंद
आज गुरुवारी पहाटे जपान एअर लाईनवर गुरुवारी सायबर हल्ला झाला आहे. हा सायबर हल्ला एअरलाइन्सच्या सर्व्हरवर झाला. यानंतर जपान एअरलाइन्सने तिकिटांची विक्री बंद केली आहे. सायबर हल्ल्यांमुळे काही देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांना उशीर होऊ शकतो, असे जपान एअरलाइन्सने सांगितले.सिस्टममध्ये बिघाड झाल्याने राउटर तात्पुरते बंद केले आहे.
विमान क्रॅश झाले की घातपात? पायलटने संपर्क साधला, हवाई दल काय करत होते?, मोठी माहिती आली समोर
याशिवाय गुरुवारी सुटणाऱ्या विमानांच्या तिकिटांची विक्रीही बंद करण्यात आली आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी ७.२४ वाजता हा सायबर हल्ला झाला. याचा परिणाम कंपनीच्या अंतर्गत आणि बाह्य दोन्ही प्रणालींवर झाला आहे.
'आम्ही या परिस्थितीचे गांभीर्य आहे. सिस्टीमला रिकव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत, असं जपान एअर लाईन्सकडून सांगण्यात येत आहे.
ANA होल्डिंग्ज या जपानी विमान कंपनीने सांगितले की, सिस्टमवर सायबर हल्ल्याची कोणतीही चिन्हे नाहीत आणि आमच्या सेवा सुरळीतपणे कार्यरत आहेत. एएनए होल्डिंग्ज ही जपान एअरलाइन्सची प्रतिस्पर्धी मानली जाते.
ख्रिसमसच्या आधी, अमेरिकन एअरलाइन्सच्या नेटवर्क हार्डवेअरमध्ये तांत्रिक समस्येमुळे एका तासासाठी सर्व उड्डाणे ग्राउंड करण्यात आली. याचा फटका हजारो प्रवाशांना बसला.
या आधीही सायबर हल्ले झाले होते
विमान कंपन्यांवर सायबर हल्ल्याची ही पहिलीच घटना आहे, असे नाही. यापूर्वी २०२२ मध्ये रॅन्समवेअर ऑपरेटर ग्रुप डिक्सिन टीमने एअर एशियाच्या ५० लाख प्रवाशांचा डेटा चोरल्याचा दावा केला होता. एअर एशिया ही मलेशियाची प्रसिद्ध विमान कंपनी आहे. २०२३ मध्ये स्वीडिश विमान कंपनी स्कॅन्डिनेव्हियन एअरलाइन्सच्या वेबसाइटवरही सायबर हल्ला झाला होता.
रशियात विमान झाले क्रॅश
कझाकस्तानमधील अकताऊ विमानतळावर काल एका प्रवासी विमान कोसळले. या विमानामध्ये ६७ प्रवासी प्रवास करत होते. या अपघातामध्ये ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. अजरबॅजान एअरलाइन्सच्या पॅसेंजर विमान बाकू येथील रशियाच्या चेचन्या येथील ग्रोन्जी विमानतळावर जात होते, त्याचवेळी पक्षाने धडक दिली. पक्ष्याच्या धडकेमुळे विमानाची ऑक्सिजन टाकी फुटल्याचा दावा करण्यात आला होता. या विमानात ६७ जण होते. यापैकी ३७ अझरबैजानचे तर १६ रशियाचे नागरिक होते. हा विमान अपघात कोणता घातपात असू शकतो असा दावाही करण्यात येत आहे.
【ネットワーク機器不具合に関するお知らせ】
— JAL 運航情報【公式】 (@JAL_flight_info) December 26, 2024
本日、7時24分から社内外を繋ぐネットワーク機器でシステム不具合が発生しております。国内線、国際線ともに運航への影響も想定されます。状況の確認が取れ次第、次回の案内にてお知らせいたします。ご迷惑をおかけしておりますことをお詫び申し上げます。