शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक खुलासा! अमेरिकेचा खरा डोळा इराणच्या तेलावर; डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'खास' खासदाराचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 08:32 IST

Crude Oil Prices: कच्च्या तेलाच्या किमतीत २० टक्क्यांची वाढ! मोजतबा खामेनेई इराणचे नवे सुप्रीम लीडर बनल्यानंतर जागतिक बाजारात खळबळ. रशिया-युक्रेन युद्धानंतरचे सर्वोच्च दर.

अमेरिका आणि इराणमधीलयुद्ध केवळ सुरक्षेसाठी नसून, त्यामागे एक मोठा आर्थिक आणि व्यावसायिक हेतू दडलेला आहे, असा खळबळजनक दावा अमेरिकेचे ज्येष्ठ सिनेट सदस्य लिंडसे ग्रॅम यांनी केला आहे. वेनेझुएलाप्रमाणेच अमेरिकेला आता इराणच्या तेल साठ्यांवर ताबा मिळवायचा आहे, असे सूचक विधान त्यांनी केले असून, यामुळे जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे.

सिनेट रॅम यांच्या मते, इराणवर करण्यात आलेली लष्करी कारवाई ही केवळ अण्वस्त्रे रोखण्यासाठी नाही. अमेरिकेची नजर इराणच्या नैसर्गिक संसाधनांवर, विशेषतः कच्च्या तेलाच्या अफाट साठ्यांवर आहे. "ज्याप्रमाणे आम्ही वेनेझुएलामध्ये हस्तक्षेप करून तेथील तेल क्षेत्रावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, तसाच प्रकार इराणमध्येही होण्याची शक्यता आहे," असे त्यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले आहे.

वेनेझुएलामध्ये जगातील सर्वाधिक कच्च्या तेलाचे साठे आहेत आणि तिथे अमेरिकेने अनेक वर्षांपासून राजकीय आणि आर्थिक निर्बंध लादले आहेत. आता इराणच्या बाबतीतही अमेरिका 'तेल नियंत्रणाची' तीच रणनीती वापरत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. जर अमेरिकेने इराणच्या तेल साठ्यांवर नियंत्रण मिळवले, तर जागतिक तेल बाजारावर अमेरिकेचे संपूर्ण वर्चस्व निर्माण होईल.

जागतिक परिणामजर हे विधान खरे ठरले, तर रशिया आणि चीन यांसारखे देश अमेरिकेच्या या भूमिकेला तीव्र विरोध करू शकतात. दुसरीकडे, भारतासारख्या देशांसाठी, जे इराणकडून तेल खरेदी करण्यास इच्छुक आहेत, हा पेच अधिक वाढण्याची शक्यता आहे.

कच्चे तेल वाढतेय...जागतिक तेल बाजारात आज रविवारी ट्रेडिंगच्या सुरुवातीलाच मोठा भूकंप झाला आहे. मध्य-पूर्वेतील वाढता तणाव आणि इराणमधील सत्तापालटाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किमतीत तब्बल २० टक्क्यांपर्यंत मोठी वाढ झाली आहे. कच्च्या तेलाने १०० डॉलरचा टप्पा ओलांडला असून, रशिया-युक्रेन युद्धानंतरचे हे सर्वात उच्चांकी दर आहेत. वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट २० टक्क्यांनी वधारून १०९.१७ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले. ब्रेंट क्रूड १९ टक्क्यांच्या वाढीसह ११०.३५ डॉलर प्रति बॅरलवर गेले.

भारताच्या खिशावर किती भार पडणार?तेलाच्या किमतीत झालेली ही १० ते २० टक्क्यांची वाढ भारतासाठी अत्यंत चिंताजनक आहे.१. महागाई: डिझेलचे दर वाढल्यास वाहतूक खर्च वाढून जीवनावश्यक वस्तू महाग होतील.२. पेट्रोल-डिझेल: लवकरच देशात इंधन दरवाढीचे संकट ओढवू शकते.३. रुपयाची घसरण: आयातीसाठी अधिक डॉलर्स मोजावे लागल्याने भारतीय रुपया कमकुवत होण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : US aims for Iran's oil, says Trump ally; global shock!

Web Summary : A US senator claims America eyes Iran's oil reserves, similar to its Venezuela strategy. This could trigger global opposition and impact oil prices, potentially harming economies like India's due to rising fuel costs.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पCrude Oilखनिज तेलIranइराणWarयुद्धAmericaअमेरिका