Crime News: मुलीच्या बेडरूममध्ये विवस्त्र इसमाला पाहून वडील भडकले, उचलली बंदूक आणि...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 13:39 IST2023-03-13T13:37:12+5:302023-03-13T13:39:34+5:30
Crime News: आपल्या मुलीच्या बेडरूमध्ये दोन लोकांना पाहून भडकलेल्या एका वडिलांनी बंदूक घेऊन त्यांच्यावर धडाधड गोळ्या झाडायला सुरुवात केली. या प्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

Crime News: मुलीच्या बेडरूममध्ये विवस्त्र इसमाला पाहून वडील भडकले, उचलली बंदूक आणि...
आपल्या मुलीच्या बेडरूमध्ये दोन लोकांना पाहून भडकलेल्या एका वडिलांनी बंदूक घेऊन त्यांच्यावर धडाधड गोळ्या झाडायला सुरुवात केली. या प्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण अमेरिकेमधील फ्लोरिडा येथील आहे.
एका वृत्तपत्रातील वृत्तानुसार ४४ वर्षांचे आरोपी डेने व्हिक्टर मिलर आहेत. त्यांनी आपल्या मुलीच्या बेडरूममध्ये दोन लोकांना पाहिले होते. त्यामदील एक इसम हा विवस्त्रावस्थेत होता. ते पाहून या मुलीचे वडील संतापले. त्यांनी या दोघांच्या दिशेने गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांना फोन केला. त्यानंतर त्यांनी त्यांना ताब्यात घेतले.
८ मार्च रोजी ज्या दोन लोकांवर गोळीबार केला ते मिलरचे रुममेट्स होते. तसेच ते मद्यधुंदावस्थेत होते. मी माझ्या मुलीच्या खोलीमध्ये असलेल्या दोन व्यक्तींवर गोळीबार केला होता. ते मद्यपान करून माझ्या मुलीच्या खोलीत चुकून घुसले होते, अशी माहिती पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये दिली.
मिलर यांच्या मुलीनेच तिच्या खोलीत कुणीतरी घुसलंस, अशी माहिती दिली होती. मात्र काही समजून येण्यापूर्वीच मिलरने गोळीबार केला. ज्या दोन लोकांवर गोळीबार करण्यात आला. त्यामधील एकाने सांगितले की मिलर ओरडत होता. मी तुम्हाला ठार मारेन, अशी धमकी देत होता. तसेच त्याने खूप जवळून आमच्यावर गोळ्या झाडल्या.
सध्या मिलर याला ली कौंटी शेरिफ यांच्या ऑफिसमध्ये कोठडीत ठेवण्यात आले आहे. त्याला कोर्टात हजर करण्यात आले. त्याच्यावर जीवघेणा हल्ला, घातक हत्यार बाळगणे, असे आरोप ठेवण्यात आले आहेत.