ब्राझीलचे कोरोना पॉझिटिव्ह राष्ट्रपती म्हणाले, "भारताकडून आलेल्या हायड्रॉक्सीक्लोरोक्विनमुळं बरं वाटतंय"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 08:25 PM2020-07-08T20:25:24+5:302020-07-08T20:28:26+5:30

ब्राझीलचे राष्ट्रपती जेअर बोलसोनारो यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

covid19 pandemic brazils president jair bolsonaro says hydroxychloroquine to cure his virus | ब्राझीलचे कोरोना पॉझिटिव्ह राष्ट्रपती म्हणाले, "भारताकडून आलेल्या हायड्रॉक्सीक्लोरोक्विनमुळं बरं वाटतंय"

ब्राझीलचे कोरोना पॉझिटिव्ह राष्ट्रपती म्हणाले, "भारताकडून आलेल्या हायड्रॉक्सीक्लोरोक्विनमुळं बरं वाटतंय"

Next
ठळक मुद्देकोरोना संकट काळात अमेरिका, ब्राझीलसह अनेक देशांना हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधाची निर्यात करून भारताने जागतिक बंधुत्व निर्माण केले आहे.

नवी दिल्ली : कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्विन (Hydroxychloroquine ) अत्यंत प्रभावी असल्याचे सिद्ध होत आहे. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध प्रामुख्याने मलेरियावर तयार करण्यात आले आहे. मात्र, आता ते कोरोना रुग्णांना अत्यंत उपयुक्त ठरत आहे. या कोरोना संकट काळात अमेरिका, ब्राझीलसह अनेक देशांना हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधाची निर्यात करून भारताने जागतिक बंधुत्व निर्माण केले आहे.

ब्राझीलचे राष्ट्रपती जेअर बोलसोनारो यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. ते सुद्धा कोरोनावरील उपचारांसाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या गोळ्या घेत आहेत. त्यांनी कोरोना उपचारावर हायड्रॉक्सीक्लोरोक्विन फायद्याचे असल्याचे म्हटले आहे. तसेच, जेअर बोलसोनारो यांनी हायड्रॉक्सीक्लोरोक्विनची प्रशंसा करणारा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.

या व्हिडिओमध्ये जेअर बोलसोनारो यांनी म्हटले आहे की, "मी येथे हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा तिसरा डोस घेत आहे. मला छान वाटते. मी रविवारी असाच होतो. मला सोमवारी आणि मंगळवारी वाईट वाटत होते. मला शनिवार पेक्षा चांगले वाटत आहे. हे (टॅब्लेट) नक्कीच कार्यरत आहे."

दरम्यान, अमेरिकेनंतर ब्राझील जगातील कोरोनाव्हायरसमुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या देशांच्या यादीत दुसर्‍या क्रमांकावर आहे. ब्राझिलमधील कोरोना संक्रमितांचा आकडा आता 15 लाख 77 हजारांवर पोहोचला आहे. तर 64 हजारांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

कोरोना महामारीमुळे अमेरिका आणि ब्राझीलची परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. अमेरिकेतील संक्रमितांची एकूण संख्या आता 28 लाख 39 हजारच्याही पुढे गेली आहे. तर आतापर्यंत 1 लाख 29 हजार लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर दुसरीकडे, ब्राझीलमध्ये एका दिवसात तब्बल 38 हजार कोरोनाबाधित समोर आले आहेत. याच काळात येथे एक हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

आणखी बातम्या...

मोफत धान्य, मजुरांना भाड्याचे घर...; मोदींच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

मी कोरोना चाचणी केली, होम क्वारंटाईन होतोय - अमोल कोल्हे

खबरदार, पालकांकडून फी मागाल तर... ; 'या' राज्य सरकारचा खासगी शाळांना सज्जड इशारा

"जे एका भावाला नाही जमलं ते अजित दादांनी शब्दासाठी 'करून दाखवलं'!"

CoronaVirus News : कोरोनावरील आणखी एक औषध लवकरच बाजारात; जाणून घ्या, किंमत...

हॅकर्सच्या निशाण्यावर MS Office युजर्स; ६२ देशांना केलं लक्ष्य

Web Title: covid19 pandemic brazils president jair bolsonaro says hydroxychloroquine to cure his virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.