अंतर्वस्त्रांच्या विक्रीत घट आणि जागतिक मंदी याचा परस्पर संबंध ?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 07:06 PM2019-08-19T19:06:09+5:302019-08-19T19:13:45+5:30

महिला आणि पुरुषांच्या अंतर्वस्त्रांची विक्रीचा संबंध हा थेट जागतिक मंदीपर्यंत असेल असे कोणताही वाटलं नसेल. जून महिन्यात समोर आलेल्या आकड्यांनुसार भारतात अंतर्वस्त्रांची विक्री कमी झाली आहे. याच संज्ञेला 'मेन्स अंडरवेअर इंडेक्स' असे म्हटले जाते.

The correlation between the decline in lingerie sales and the global recession | अंतर्वस्त्रांच्या विक्रीत घट आणि जागतिक मंदी याचा परस्पर संबंध ?

अंतर्वस्त्रांच्या विक्रीत घट आणि जागतिक मंदी याचा परस्पर संबंध ?

Next

पुणे : महिला आणि पुरुषांच्या अंतर्वस्त्रांची विक्रीचा संबंध हा थेट जागतिक मंदीपर्यंत असेल असे कोणताही वाटलं नसेल. जून महिन्यात समोर आलेल्या आकड्यांनुसार भारतात अंतर्वस्त्रांची विक्री कमी झाली आहे. याच संज्ञेला 'मेन्स अंडरवेअर इंडेक्स' असे म्हटले जाते. १९७० साली अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बोर्डाचे अध्यक्ष एलन ग्रीनस्पेन यांनी ही संकल्पना मांडली होती. या संकल्पनेनुसार  विचार केला तर सध्या भारताला मोठ्या जागतिक मंदीला  तोंड द्यावे लागेल असे सांगण्यात येत आहेत. या इंडेक्सनुसार १९९०, २००१, २००७साली जागतिक मंदीचा इशारा देण्यात आला होता. 

 यामागचा साधारण अर्थ असा की, व्यक्तीकडे किंवा समाजाकडे पैसे असतील तरच ते आरोग्य आणि सुख सुविधांवर खर्च केले जातात. ज्या पद्धतीने अंतर्वस्त्र आणि डायपरची खरेदी खालावत आहे ते बघता भारतात आर्थिक मंदी येणार असल्याचा निष्कर्ष यात मांडण्यात आला आहे. सध्या देशात ऑटोमोबाईल क्षेत्रात काहीसे तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे या नव्या व्याख्येने अनेकांना विचारात पाडले आहे. अमेरिकेत याचा अभ्यास केला असता डायपरची विक्री कमी होऊन त्वचेचा संसर्ग कमी करणाऱ्या क्रीमच्या विक्रीत वाढ होते. सध्या भारतात व्हीआयपी, लक्स आणि डॉलर या तीन अंतर्वस्त्रांच्या किंमतीत घट झाली असून केवळ जॉकी कंपनीच्या विक्रीत वाढ झाली आहे. 

डेटिंग साईट आणि जागतिक मंदी ?

याशिवाय डेटिंग साईट आणि जागतिक मंदी यांचाही पस्पर संबंध मानण्यात येतो. व्यक्ती सर्वाधिक तणावग्रस्त असताना त्यांना जोडीदाराची गरज असते. त्यामुळे या काळात डेटिंग साईटलाही चांगला प्रतिसाद मिळतो. इतकेच नव्हे तर वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यानंतरही अमेरिकेत डेटिंग साईटच्या वापरात वाढ झाल्याचे दिसून आले होते. 

Web Title: The correlation between the decline in lingerie sales and the global recession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.