Coronavirus: फेस मास्कसंदर्भात WHOच्या नव्या गाईडलाईन्स आणखी कठोर, आता दिल्या अशा सूचना

By श्रीकृष्ण अंकुश | Published: December 3, 2020 10:04 AM2020-12-03T10:04:22+5:302020-12-03T10:06:48+5:30

जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी फेस मास्क वापरासंदर्भातील नव्या गाईडलाईन्स आणखी कठोर केल्या आहेत. डब्ल्यूएचओने सूचना दिल्या की...

Coronavirus WHO's new guidelines on face masks strict | Coronavirus: फेस मास्कसंदर्भात WHOच्या नव्या गाईडलाईन्स आणखी कठोर, आता दिल्या अशा सूचना

Coronavirus: फेस मास्कसंदर्भात WHOच्या नव्या गाईडलाईन्स आणखी कठोर, आता दिल्या अशा सूचना

Next
ठळक मुद्देडब्ल्यूएचओने सूचना दिल्या आहेत, की कोरोनाचा जेथे प्रसार होत आहे, तेथील आरोग्य केंद्रांवरील प्रत्येक व्यक्तीने फेस मास्कचा वापर करावा12 वर्ष अथवा त्याहून अधिक वय असलेल्या मुलांसह सर्वांनीच फेस मास्कचा वापर करावा.मुले, विद्यार्थी आणि पाहुन्यांसाठीही शिफासर

वॉशिंग्टन - जगभरात कोरोनाचे थैमान अद्यापही सुरूच आहे. यामुळे सर्वच देशांत फेस मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. याच अनुशंगाने जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी फेस मास्क वापरासंदर्भातील नव्या गाईडलाईन्स आणखी कठोर केल्या आहेत. डब्ल्यूएचओने सूचना दिल्या आहेत, की कोरोनाचा जेथे प्रसार होत आहे, तेथील आरोग्य केंद्रांवरील प्रत्येक व्यक्तीने फेस मास्कचा वापर करावा. यापूर्वी जून महिन्यात डब्ल्यूएचओने सर्व सरकारांना सूचना देत सार्वजनिक ठिकाणी आत आणि बाहेर प्रत्येकाने फेब्रिक मास्कचा वापर करावा, असे म्हटले होते. 

आता WHOच्या नव्या गाईडलाईन्स - 
आता कोरोना व्हायरसची दुसरी लाट वेग धरू लागली आहे. या अनुशंगाने डब्ल्यूएचओने बुधवारी जारी केलेल्या सविस्तर शिफारशींमध्ये सूचना दिल्या आहेत, की ज्या भागात कोरोना पसरत आहे. तेथे 12 वर्ष अथवा त्याहून अधिक वय असलेल्या मुलांसह सर्वांनीच फेस मास्कचा वापर करावा. दुकाने, कार्यालये आणि शैक्षणिक संस्थानांमध्ये हवेच्या क्लियरन्सचे व्यवस्थापन खराब असल्यास, हे अत्यंत आवश्यक आहे.

मुले, विद्यार्थी आणि पाहुन्यांसाठीही शिफासर -
गाईडलाईन्सनुसार, जेथे व्यवस्थितपणे हवेचे व्यवस्थापन नसेल, अशा घरांमध्येही पाहुने आल्यानंतर फेस मास्कचा वापर करण्यात यावा. जेथे हवेचे चांगले व्यवस्थापन आहे, मात्र, आपसांत एक मिटरचे अंतर ठेवणे शक्य नाही, अशा ठिकाणीही फेसमास्कचा अवश्य वापर करण्यात यावा.

जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे, की फेस मास्क व्हायरसपासून संरक्षण देतात. याच बरोबर सातत्याने हात धुण्यावरही भर द्यायला हवा. गाईडलाईन्समध्ये अशीही सूचना देण्यात आली आहे, की कोविड-19 रुग्णांची देखभाल करताना हेल्थ केअर वर्कर्सनी एन-95 मास्कचा वापर करावा. याच बरोबर जागतिक आरोग्य संघटनेने एक सल्लाही दिला आहे, की कठोर शारिरीक कार्य करणाऱ्या लोकांनी मस्काचा वापर करू नये. यासंदर्भातील धोके सांगताना त्यांनी विशेषतः दम्याच्या रुग्णाना होणाऱ्या समस्यांचा संदर्भ दिला.

Web Title: Coronavirus WHO's new guidelines on face masks strict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.