शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

CoronaVirus: ...म्हणून चीननं जगापासून लपवली कोरोनासंदर्भातील माहिती, अमेरिकेचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2020 2:51 PM

जानेवारीच्या सुरुवातीच्या काळात चिनी नेत्यांनी जगभरात पसरलेल्या या साथीच्या रोगाची तीव्रता जाणूनबुजून लपविली.

ठळक मुद्देकोरोना व्हायरसनं जगभरात धुमाकूळ घातला असून, अमेरिकेलाही याचा मोठा फटका बसला आहे. सेच चीननं एका विशिष्ट उद्देशानं हा व्हायरस तयार केल्याचाही आरोप होतो आहे. कोरोनाचं किती मोठ्या प्रमाणात संक्रमण झालं हे पाहण्यासाठीच चीननं माहिती लपवून ठेवली आहे.

वॉशिंग्टनः कोरोना व्हायरसनं जगभरात धुमाकूळ घातला असून, अमेरिकेलाही याचा मोठा फटका बसला आहे. विशेष म्हणजे अमेरिकेकडून वारंवार चीननं कोरोनासंदर्भातील माहिती लपवल्याचा आरोप केला जात आहे. तसेच चीननं एका विशिष्ट उद्देशानं हा व्हायरस तयार केल्याचाही आरोप होतो आहे. आता कोरोना व्हायरसची माहिती लपवण्यामागे अमेरिकेनं नवा खुलासा केला आहे. कोरोनाचं किती मोठ्या प्रमाणात संक्रमण झालं हे पाहण्यासाठीच चीननं माहिती लपवून ठेवली आहे. जेणेकरून ते इतर देशांना निर्यात करत असलेला वैद्यकीय पुरवठा वाढवू शकतील. चीनने या व्हायरससंदर्भात माहिती लपवून ठेवल्याचे गुप्तचर दस्तऐवजांमधून उघड झाले आहे. होमलँड इंटेलिजन्स सिक्युरिटी (डीएचएस) विभागाच्या मेच्या अहवालानुसार, जानेवारीच्या सुरुवातीच्या काळात चिनी नेत्यांनी जगभरात पसरलेल्या या साथीच्या रोगाची तीव्रता जाणूनबुजून लपविली.त्यानंतर ट्रम्प प्रशासनाने पुन्हा एकदा चीनवर टीकेची तोफ डागली आहे. परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ यांनी रविवारी सांगितले की, व्हायरसच्या संक्रमणासाठी चीनला जबाबदार धरावे आणि त्यांची कारवाईही निश्चित केली जावी. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजकीय विरोधकांनी चीनवर टीका केल्यामुळे त्यांच्यावर निशाणा साधला होता. चीन हा अमेरिकेचा महत्त्वाचा भागीदार आहे, असं विरोधकांचं म्हणणं आहे. डीएचएसच्या विश्लेषणात म्हटले आहे की, कोरोना विषाणूची तीव्रता लपविताना चीनने आयात वाढविली आणि वैद्यकीय पुरवठ्यांची निर्यात कमी केली. अहवालात म्हटले आहे की, कोरोना विषाणूचं संक्रमण झालं आहे हे चीननं जागतिक आरोग्य संघटनेलाही सांगितलेलं नव्हतं. जेणेकरून परदेशातून वैद्यकीय पुरवठा मागविता येईल. चीनने फेस मास्क आणि सर्जिकल गाऊन आणि हातमोजे (ग्लोव्हज)ची आयात मोठ्या प्रमाणात वाढवली. चीनच्या आयात आणि निर्यात वर्तनात बदल झाल्याचंही जानेवारीपासून पाहायला मिळालं. तसेच रविवारी ट्विट करत डोनाल्ड ट्रम्प यांनी गुप्तचर यंत्रणांच्या अधिकाऱ्यांवरही निशाणा साधला होता. गुप्तचर यंत्रणांनी कोरोना व्हायरस किती भयंकर आहे हे आधीच स्पष्ट केलं नाही. गुप्तचर यंत्रणांना यासंदर्भात योग्य माहिती मिळाल्यानंतरही त्यांनी महत्त्वाची पावलं न उचलल्याचा आरोप केला आहे. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus: धक्कादायक! कोरोनाची रहस्यमय माहिती असलेली चीनमधील प्रसिद्ध 'बॅट वुमन' अचानक गायब

फेसबुकनंतर जिओचा आणखी एक मोठा करार; अमेरिकेच्या 'या' कंपनीसोबत मिळवला हात

Coronavirus: पीएम केअर्स फंडाला 151 कोटी देऊ शकता; मग मजुरांकडून तिकिटाचे पैसे का घेता?- राहुल गांधी

Coronavirus: घरी परतणाऱ्या मजुरांचा खर्च उचलणार काँग्रेस, सोनिया गांधींची मोठी घोषणा

Coronavirus: कोरोना लसीच्या आम्ही एकदम जवळ; डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितली 'वेळ'

होय, ते परत येताहेत; पण तिरंग्यात लपेटून; शहीद कर्नल शर्मा यांच्या पत्नीची आर्त भावना

एन्काऊंटरवेळी कर्नलच्या फोनवर दहशतवाद्यांनी म्हटलं अस्सलाम वालेकुम; अन्...

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाchinaचीनWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना