शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

CoronaVirus News: ...तर भारतातील कोरोना रुग्णांची संख्या १९ लाखांपेक्षा जास्त असेल; ट्रम्प यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2020 2:59 PM

CoronaVirus News: डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अमेरिकेची तुलना चीन आणि भारतासोबत

वॉशिंग्टन: भारत आणि चीननं अधिक कोरोना चाचण्या केल्यास त्या देशांमधील कोरोना रुग्णांची संख्या अमेरिकेपेक्षा जास्त असेल, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. अमेरिकेनं आतापर्यंत २ कोटी चाचण्या केल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी इतर देशांमधील कोरोना चाचण्यांची आकडेवारी दिली. जर्मनीनं ४० लाख चाचण्या केल्या आहेत. तर सर्वाधिक चर्चा झालेल्या दक्षिण कोरियात करण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या तीस लाखांच्या घरात असल्याचं ट्रम्प म्हणाले.अमेरिकेतल्या जॉन्स हॉपकिन्स कोरोना व्हायरस रिसोर्स सेंटरनं दिलेल्या माहितीनुसार देशातील कोरोना रुग्णांची संख्या १९ लाखांपेक्षा जास्त आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोनामुळे १ लाख ९ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात आतापर्यंत २ लाख ३६ हजार १८४ जणांना, तर चीनमध्ये ८४ हजार १७७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. भारतानं आतापर्यंत ४० लाख जणांच्या कोरोना चाचण्या केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं याबद्दलची माहिती दिली आहे. अमेरिकेनं आतापर्यंत २ कोटींहून जास्त कोरोना चाचण्या घेतल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. तुम्ही जितक्या जास्त चाचण्या घेता, तितके जास्त रुग्ण आढळून येतात, असं ट्रम्प यांनी म्हटलं. 'जितक्या जास्त चाचणी होतील, तितके जास्त रुग्ण सापडतील. आपण जास्त चाचण्या घेत असल्यानं रुग्णांची संख्यादेखील जास्त आहे,' असं म्हणत असताना ट्रम्प यांनी भारत आणि चीनचा संदर्भ दिला. 'चीन आणि भारतानंदेखील चाचण्यांची संख्या वाढवल्यास तिथे अमेरिकेपेक्षा जास्त रुग्ण आढळून येतील,' असं ट्रम्प म्हणाले.जगातील कोरोना बाधितांची संख्या ६८ लाखांहून जास्त आहे. यात अमेरिकेचे सर्वाधिक रुग्ण आहेत. अमेरिकेतील १९ लाखांपेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाणही अमेरिकेत लक्षणीय आहे. जगभरात आतापर्यंत कोरोनामुळे जवळपास ४ लाख जणांचा मृत्यू झाला आहे. यातले १ लाखांहून अधिक जण एकट्या अमेरिकेतले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पIndiaभारतchinaचीनAmericaअमेरिका