शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

Coronavirus : चक्क ८५ हजार कैद्यांना केले तात्पुरते मुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 8:08 PM

Coronavirus : कारागृहातून तात्पुरते मुक्त करण्यात आलेल्या कैद्यांपैकी ५० टक्के कैद्यांना सुरक्षेसंदर्भातील गुन्ह्यांमध्ये जेरबंद करण्यात आले होते.

ठळक मुद्दे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी चक्क ८५ हजार कैद्यांना कारागृहातून तात्पुरते मुक्त केलं आहे. इराणने नुकतेच १२ कैदी असलेल्या राजकारण्यांची सुटका केली असून प्रमुख राजकीय नेते जे कैदी आहेत त्यांना मात्र तुरुंगातच ठेवण्यात आले आहे.

दुबई - संपूर्ण जगभरामध्ये पसरत चाललेल्या कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे उपाययोजना आखल्या आहेत. चीन देशातून फैलाव झालेल्या कोरोनाचा सर्वाधिक फटका इराणला बसला आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी चक्क ८५ हजार कैद्यांना कारागृहातून तात्पुरते मुक्त केलं आहे. देशातील कायदा आणि न्यायव्यवस्थेसंदर्भातील प्रवक्ते गोल्हामुसेन इस्मायली यांनी ही माहिती दिली आहे. कारागृहातून तात्पुरते मुक्त करण्यात आलेल्या कैद्यांपैकी ५० टक्के कैद्यांना सुरक्षेसंदर्भातील गुन्ह्यांमध्ये जेरबंद करण्यात आले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कारागृहात होऊ नये, पसरू नये म्हणून या कैद्यांना मुक्त करण्यात आले आहे. पूर्ण काळजी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रांचे मानवाधिकार काद्यासंदर्भातील नियुक्त अधिकारी जावेद रेहमान यांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राजकीय नेत्यांना तुरुंगात डांबण्यात आलेल्यांची तात्पुरती सुटका करावी अशी मागणी सरकारकडे केली होती. रेहमान यांची मागणी मान्य करण्यात आली आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच ७० हजार कैद्यांची तात्पुरती सुटका करण्यात आली.इराणमध्ये कोरोनाची बाधा १४ हजार ९०० हून अधिक झाली आहे. तसेच कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या ८५३ इतकी आहे. याच पार्श्वभूमीवर क्षमतेपेक्षा अधिक कैदी असणाऱ्या तुरुंगात कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून कैद्यांना तात्पुरत्या स्वरुपात मुक्त करण्यात आलं आहे. इराणने नुकतेच १२ कैदी असलेल्या राजकारण्यांची सुटका केली असून प्रमुख राजकीय नेते जे कैदी आहेत त्यांना मात्र तुरुंगातच ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :PrisonतुरुंगjailतुरुंगDubaiदुबईIranइराणcorona virusकोरोना वायरस बातम्या