coronavirus: शास्त्रज्ञांनी लावला कोरोना विषाणूला निष्क्रीय करणाऱ्या जीवाणूंचा शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 09:10 IST2020-05-27T08:50:01+5:302020-05-27T09:10:38+5:30

चीन आणि अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी संयुक्तरीत्या संशोधन करून कोरोना विषाणू, डेंग्यू आणि एचआयव्हीसह विषाणूंची साखळी तोडणाऱ्या दोन जीवाणूस्रावित प्रोटीनचा शोध लावला आहे.

coronavirus: Scientists discover bacteria that inactivate the corona virus BKP | coronavirus: शास्त्रज्ञांनी लावला कोरोना विषाणूला निष्क्रीय करणाऱ्या जीवाणूंचा शोध

coronavirus: शास्त्रज्ञांनी लावला कोरोना विषाणूला निष्क्रीय करणाऱ्या जीवाणूंचा शोध

ठळक मुद्देसंशोधकांनी एडिज इजिप्टी डासांच्या आतड्यांमध्ये सापडणाऱ्या एका जीवाणूचा शोध घेतला आहे यादरम्यान, त्यांना एचआयव्ही, डेंग्यू आणि नव्या कोरोना विषाणूसह अन्य विषाणूंना प्रभावी पद्धतीने निष्क्रीय करण्यात सक्षम असलेल्या दोन प्रोटीनचा शोध लागलाहे संशोधन भविष्यकाळात विषाणूरोधी औषधांच्या निर्मितीसाठी आधार बनू शकते

बीजिंग - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जागतिक पाळतीवर मोठे संकट निर्माण झालेले आहे. कोरोनावर प्रभावी लस शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू आहे. यादरम्यान, संपूर्ण जगाला दिलासा देणारे एक वृत्त आले असून, चीन आणि अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी संयुक्तरीत्या संशोधन करून कोरोना विषाणू, डेंग्यू आणि एचआयव्हीसह विषाणूंची साखळी तोडणाऱ्या दोन जीवाणूस्रावित प्रोटीनचा शोध लावला आहे. हे संशोधन भविष्यकाळात विषाणूरोधी औषधांच्या निर्मितीसाठी आधार बनू शकते. असा दावा चीनचे सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सने केला आहे.

या वृत्तात दिलेल्या माहितीनुसार संशोधकांनी सुरुवातीला एडिज इजिप्टी डासांच्या आतड्यांमध्ये सापडणाऱ्या एका जीवाणूचा शोध घेतला आहे. त्यानंतर या जीवाणूचे वैशिष्ट शोधण्यासाठी त्याच्या संपूर्ण जीनोमचा अभ्सास केला. यादरम्यान, त्यांना एचआयव्ही, डेंग्यू आणि नव्या कोरोना विषाणूसह अन्य विषाणूंना प्रभावी पद्धतीने निष्क्रीय करण्यात सक्षम असलेल्या दोन प्रोटीनचा शोध लागला आहे.  

 या संशोधनामध्ये त्सिंगहुआ विद्यापीठ आणि अॅकॅडमी ऑफ मिलिटरी मेडिकल सायन्सेस बीजिंग, रोग रोगथाम आणि नियंत्रण केंद्र, शेंझेन आणि अमेरिकेमधील  कनेक्टिकट विश्वविद्यालयातील संशोधक सहभागी होते.

इतर महत्त्वाच्या बातम्या   

गरज पडल्यास आमचे सैन्य लढण्यास तयार, नेपाळच्या संरक्षणमंत्र्यांची भारताला धमकी

लॉकडाऊन न करताच या मोठ्या देशाने कोरोनाला दिली मात, नागरिकांची ही सवय ठरली उपयुक्त

चिंताजनक! अ‍ॅमेझॉनच्या जंगलातही कोरोनाचा शिरकाव, अनेक आदिवासी जमातींचे अस्तित्व संकटात

पहिल्याच दिवशी विमानसेवेचा बोजवारा, दिल्ली, मुंबईतून जाणारी अनेक विमाने रद्द, प्रवाशांना मनस्ताप

कोरोनामुळे निर्माण झालेल्या तणावादरम्यान अमेरिकेचा चीनला तगडा धक्का, केली मोठी कारवाई 

लॉकडाऊन आणि मंदीचे सावट असतानाही ही कंपनी करणार ५० हजार कर्मचाऱ्यांची मेगाभरती 

Web Title: coronavirus: Scientists discover bacteria that inactivate the corona virus BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.