शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

Coronavirus : अभिमानास्पद! अमेरिकेतील प्रत्येक सातवा डॉक्टर हा भारतीय वंशाचा 'कोरोना वॉरियर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 21:52 IST

Coronavirus : वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 2,07,906 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 2,07,906 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर कोरोनाग्रस्तांची संख्या 30 लाखांवर पोहोचली आहे. कोरोनाग्रस्तांसाठी वैद्यकिय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहेत. घरापासून दूर राहून ते कोरोनाग्रस्तांवर उपचार करत आहेत. अशीच एक अभिमानास्पद घटना समोर आली आहे. 

महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची आणि मृतांची संख्या ही सर्वाधिक आहे. जगावर कोरोनाचे संकट आले आहे. कोरोनाशी लढणारा अमेरिकेतील प्रत्येक सातवा डॉक्टर हा भारतीय वंशाचा आहे. कोरोना विरोधातील या लढ्यात तो सैनिकांप्रमाणे लढत असल्याची कौतुकास्पद घटना समोर आली आहे. भारतीय वंशाच्या डॉक्टरांची संघटना असलेल्या अमेरिकन फिजिशियन ऑफ इंडियन ओरिजिन (AAPI) चे अध्यक्ष डॉ. सुरेश रेड्डी यांनी कोरोना व्हायरसचा सामना करणाऱ्या हजारो भारतीय डॉक्टरांचे कौतुक केले आहे.

डॉ. सुरेश रेड्डी यांनी 'अमेरिकेतील प्रत्येक सातवा डॉक्टर हा भारतीय आहे आणि कोरोना व्हायरसशी सुरू असलेल्या या युद्धामध्ये तो अग्रस्थानी उभा राहून खंबीरपणे लढत आहे. भारतीय डॉक्टर सैनिकांप्रमाणेच संकटाचा सामना करत आहेत' असं म्हटलं आहे. तसेच कोरोनाशी सुरू असलेला हा लढा बराच काळ सुरू राहणार आहे. एक-दोन महिन्यांत हा व्हायरस संपणार नाही. यावरची लस तयार होईपर्यंत कोरोना व्हायरस हा साधारण एक किंवा दोन वर्षे राहू शकतो असं देखील रेड्डी यांनी सांगितलं आहे. नियोजित पद्धतीने लॉकडाऊन काढावे लागणार आहे. अन्यथा कोरोनामुळे होणारं नुकसान हे अधिक होईल असं देखील त्यांनी म्हटलं. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेत कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या भारतीय डॉक्टरचा अनोख्या पद्धतीने सन्मान करण्यात आला आहे. उमा मधूसूदन असं या भारतीय वंशाच्या डॉक्टरचं नाव असून त्या सध्या साऊथ विंडसरमध्ये राहतात. उमा मधूसूदन यांनी अमेरिकेत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार केले असून त्यातील अनेक जण बरे झाले आहेत. उमा यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाचा अमेरिकेतील लोकांनी अनोख्यारितीने सन्मान केला आहे. तब्बल 100 गाड्यांच्या ताफ्यासह त्यांचे आभार मानले आहेत. अमेरिकेतील लोकांनी गाड्यांचे हॉर्न वाजवत त्यांचा सन्मान केला. या कौतुकास्पद घटनेचा एक व्हिडिओ अनेकांनी शेअर केला असून सोशल मीडियावरही जोरदार व्हायरल झाला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या 

Coronavirus : कौतुकास्पद! भूक नाही तर स्वाभिमान मोठा; आदिवासींनी नाकारलं मोफत रेशन, म्हणाले...

Coronavirus : 'कोरोना'चे तब्बल 2,07,906 बळी, जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 30 लाखांवर

Coronavirus : दिल्लीत डॉक्टर, नर्ससह तब्बल 170 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

Video : धक्कादायक! VIP ताफ्यासाठी पोलिसांनी थांबवली रुग्णवाहिका

Coronavirus : भारीच! फक्त चेहरा पाहून कोरोनाची माहिती मिळणार, 'हे' उपकरण फायदेशीर ठरणार

Coronavirus : 'मी जिवंत आहे', डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या रुग्णाचा धक्कादायक Video

Coronavirus : 'लॉकडाऊनमध्ये आमच्या शिक्षिका क्लास घेतात', 5 वर्षांच्या चिमुकल्याची थेट पोलिसांकडे तक्रार

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाIndiaभारतDeathमृत्यू