शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: अमेरिकेत नवे ३४ हजारांवर रुग्ण, साथ पसरण्यास राजकारणी जबाबदार; वैद्यकीय तज्ज्ञांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 04:08 IST

राजकारणी तसेच निर्बंध पाळण्यात कुचराई करणारे नागरिक यांच्यामुळे ही साथ अधिकाधिक भागांत पसरत आहे, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

ह्यूस्टन : अमेरिकेमध्ये कोरोना विषाणूच्या साथीने पुन्हा डोके वर काढले असून, आता या आजाराने दक्षिण व पश्चिमेकडील राज्यांना ग्रासले आहे. राजकारणी तसेच निर्बंध पाळण्यात कुचराई करणारे नागरिक यांच्यामुळे ही साथ अधिकाधिक भागांत पसरत आहे, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.अमेरिकेमध्ये बुधवारी एका दिवसात कोरोनाचे ३४ हजाराहून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. काही आठवड्यांपूर्वी एका दिवसात कोरोनाचे ३६ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले होते, असे जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने म्हटले आहे. याआधी कोरोनाने हाहाकार माजविलेल्या न्यूयॉर्क, न्यूजर्सी व अन्य राज्यांमध्ये या साथीचा जोर काहीसा ओसरला आहे. आता अ‍ॅरिझोना, कॅलिफोर्निया, मिसिसिपी, नेवाडा, टेक्सास, ओक्लाबोमा अशा ठिकाणी कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत.ह्यूस्टन मेथडिस्ट हॉस्पिटल सिस्टिमचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मार्क बूम यांनी सांगितले की, कोरोनाचे संकट आता दूर होत आहे असे वाटून लोकांनी निष्काळजीपणे वावरायला सुरूवात केली. त्यामुळे या साथीने आता पुन्हा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे अमेरिकेत १ लाख २0 हजारांहून अधिक जण मरण पावले असून, २३ लाख लोकांना विषाणूची बाधा झाली आहे. देशात कोरोना बळींची संख्या आॅक्टोबरपर्यंत १ लाख ८० हजारावर पोचेल, असा विद्यापीठाचा अंदाज आहे. (वृत्तसंस्था)>न्यूयॉर्कसह तीन राज्यांतक्वारंटाइन बंधनकारकअमेरिकेत कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झालेल्या राज्यांतून न्यूयॉर्क, कनेक्टिकट, न्यूजर्सी येथे येणाऱ्या प्रवाशांना१४ दिवस क्वारंटाइनमध्ये राहावे लागणार आहे. तसा निर्णय या राज्यांनी घेतला आहे.न्यूयॉर्कच्या गव्हर्नरनी सांगितले की, प्रांतात कोरोनाचा पुन्हा उद्रेक होऊ नये म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठीच इतर राज्यांतून येणाºया लोकांना क्वारंटाइनमध्ये राहाणे बंधनकारक करण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या