Coronavirus:...तर आम्ही मदत करु; कर्जबाजारी पाक पंतप्रधान इमरान खानची भारताला ऑफर!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 06:49 PM2020-06-11T18:49:55+5:302020-06-11T18:53:50+5:30

आमच्या सरकारने अत्यंत पारदर्शक पद्धतीने एक कोटी कुटुंबांना नऊ आठवड्यांत १२० अब्ज रुपये यशस्वीरित्या हस्तांतरित केले आहेत.

Coronavirus: Pakistan Pm Imran Khan Offer Help To India Disburse Cash In Lockdown Victim | Coronavirus:...तर आम्ही मदत करु; कर्जबाजारी पाक पंतप्रधान इमरान खानची भारताला ऑफर!

Coronavirus:...तर आम्ही मदत करु; कर्जबाजारी पाक पंतप्रधान इमरान खानची भारताला ऑफर!

googlenewsNext
ठळक मुद्देभारतातील ३४ टक्के घरं विना मदतीचे १ आठवडेही जगू शकत नाहीएका रिपोर्टचा हवाला देत पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारतावर कुरघोडी पाकिस्तानात एक कोटी कुटुंबांना नऊ आठवड्यांत १२० अब्ज रुपये यशस्वीरित्या हस्तांतरित केले

इस्लामाबाद – चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगावर थैमान घातलं आहे. अशात पाकिस्तानसारखा देश आर्थिक डबघाईला आल्याने कर्ज काढून देश चालवायची वेळ आली आहे. त्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारताला मदत करण्याची ऑफर दिली आहे. इमरान खान यांनी एका रिपोर्टचा हवाला दिला आहे, भारतातील ३४ टक्के घर विना मदतीचे १ आठवडेही जगू शकत नाही असं म्हटलं आहे.

पाकिस्तान पंतप्रधान इमरान खान यांनी या बातमीची लिंक ट्विट करत म्हटलं आहे की, या रिपोर्टनुसार भारतात ३४ टक्के घर विना मदतीशिवाय एक आठवड्यापेक्षा जास्त जगू शकत नाहीत. मी भारताला मदत आणि ट्रान्सफर प्रोग्रामला जनतेपर्यंत पोहचू शकतो, आम्ही कॅश ट्रान्सफर प्रोग्राम जनतेपर्यंत पोहचवला आहे. त्यातील पारदर्शकतेची आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुकही झालं आहे.

आमच्या सरकारने अत्यंत पारदर्शक पद्धतीने एक कोटी कुटुंबांना नऊ आठवड्यांत १२० अब्ज रुपये यशस्वीरित्या हस्तांतरित केले आहेत. जेणेकरुन गरीब कुटुंबांना कोरोना विषाणूच्या काळात जगणं कठीण होणार नाही असं इमरान खान यांनी म्हटलं आहे, इमरान खान यांनी एका रिपोर्टचा हवाला दिला आहे ज्यात कोरोना व्हायरस लॉकडाऊनचा भारतात फार गंभीर परिणाम झाला आहे असं म्हटलं आहे.

भारतीयांच्या खात्यावर त्वरित पैसे पाठवण्याची गरज

शिकागो विद्यापीठ आणि मुंबईच्या इन्स्टिट्यूट सेंटर फॉर मॉनिटरिंग ऑफ इंडियन इकॉनॉमीच्या अहवालात हा दावा केला गेला आहे. या अहवालात असं म्हटले आहे की, लॉकडाऊनमुळे सुमारे ८४ टक्के कुटुंबांच्या उत्पन्नामध्ये घट झाली आहे. एकूण कुटुंबांपैकी एक तृतीयांश अतिरिक्त मदतीशिवाय आठवड्यापेक्षा जास्त काळ जगू शकत नाहीत. भारतीयांना त्वरित पैसे आणि अन्न देण्याची नितांत आवश्यकता आहे असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान इमरान खान यांनी मदतीच्या बहाण्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. लॉकडाऊनमुळे भारतात अनेक लोक भुकेचे बळी जात आहेत, तसं पाकिस्तानात नुकसान झालं नाही. लॉकडाऊनमुळे देशाला ८०० कोटींचे नुकसान झाले आहे. पाकिस्तानात कोरोना विषाणूचा कहर माजला असताना इमरान खान भारताला मदत देण्याची भाषा करत आहेत. त्यांचे मंत्री कोरोनाच्या जाळ्यात अडकले आहेत. विविध बँकांकडून कर्ज घेऊन पाकिस्तान सध्या देश चालवत आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

मनातील कोरोनाची भीती काढून टाका; ८३ जिल्ह्यांच्या सर्व्हेतून मिळाली समाधानाची बातमी

भारताविरुद्ध चीनचा माईंडगेम! लडाख सीमेवर आणल्या अत्याधुनिक ‘बाहुबली तोफ’

त्या’ १३ तासांत काय घडलं? गर्भवती महिलेच्या पतीने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा थरारक अनुभव!

मुख्यमंत्र्यांनंतर आता ज्योतिरादित्य शिंदेंची ऑडिओ क्लीप व्हायरल; ५० लाख रुपये दिल्याचा संवाद

काँग्रेस आमदारांना जयपुरच्या हॉटेलमध्ये पाठवलं; भाजपा आमिष दाखवत असल्याचा मुख्यमंत्र्यांचा आरोप

 

Web Title: Coronavirus: Pakistan Pm Imran Khan Offer Help To India Disburse Cash In Lockdown Victim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.