Coronavirus: मनातील कोरोनाची भीती काढून टाका; ८३ जिल्ह्यांच्या सर्व्हेतून मिळाली समाधानाची बातमी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 05:26 PM2020-06-11T17:26:28+5:302020-06-11T17:28:40+5:30

जगापेक्षा भारतात प्रति लाख लोकसंख्येच्या तुलनेत कोविड १९ रूग्णांची संख्या आणि मृत्यूदर सर्वात कमी आहे पण लॉकडाऊनच्या साडेपाच आठवड्यांनंतर ३० एप्रिलपर्यंत हीच स्थिती आहे हे लक्षात ठेवा.

Coronavirus: India With 0.73% Corona Infected Population Has Lowest Fatality Rates In The World | Coronavirus: मनातील कोरोनाची भीती काढून टाका; ८३ जिल्ह्यांच्या सर्व्हेतून मिळाली समाधानाची बातमी

Coronavirus: मनातील कोरोनाची भीती काढून टाका; ८३ जिल्ह्यांच्या सर्व्हेतून मिळाली समाधानाची बातमी

Next
ठळक मुद्दे८३ जिल्ह्यांतील २८ हजार ५९५ घरांना भेट दिली आणि २६, ४०० लोकांच्या रक्ताचे नमुने घेतलेजिल्ह्यांमधील केवळ ०.७३ टक्के लोकांना संसर्ग झाल्याचे पुरावे आहेत. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात १.०९ आणि शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये १.८९ पटीने धोका आहे

नवी दिल्ली - देशातील ८३ जिल्ह्यांत केवळ ०.७३ टक्के लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्याचसोबत कोविड -१९ मधील रुग्णांचा मृत्यू दर देखील जगात सर्वात कमी भारतात आहे ही चांगली बाब आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (आयसीएमआर) महासंचालक डॉ. बलाराम भार्गव यांनी सिरोच्या सर्वेक्षणातील निकालांची माहिती दिली आहे.

जगापेक्षा भारतात प्रति लाख लोकसंख्येच्या तुलनेत कोविड १९ रूग्णांची संख्या आणि मृत्यूदर सर्वात कमी आहे पण लॉकडाऊनच्या साडेपाच आठवड्यांनंतर ३० एप्रिलपर्यंत हीच स्थिती आहे हे लक्षात ठेवा. तथापि, त्यांनी असंही म्हटलं आहे की, अद्यापही आपली मोठी लोकसंख्या धोक्यात आहे, त्यामुळे संसर्ग झपाट्याने पसरू शकेल. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात १.०९ आणि शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये १.८९ पटीने धोका आहे. अशा परिस्थितीत आपल्याला उपचार आणि औषधे वगळता सर्व खबरदारी घेण्यावर आपला भर असला पाहिजे.

शहरांमधील झोपडपट्टी भागात संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक असतो. राज्य सरकारांना स्थानिक पातळीवर लॉकडाऊन लागू करावे लागतील. कंन्टेंन्मेंट झोनमध्ये संसर्गाची पातळी खूप जास्त असल्याचे आढळले आहे. डॉ भार्गव यांनी सिरो सर्व्हेबद्दल सांगितले की, त्यातून बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी माहिती पडल्या आहेत. सिरो सर्व्हेमध्ये सामान्य माणसाच्या अँन्टीबॉडीजची चाचणी केली जाते. या चाचणीसाठी, लोकांचे रक्ताचे नमुने घेऊन आयजीजी अँटीबॉडीजची तपासणी केली जाते. जर एखादी व्यक्ती आयजीजी पॉझिटिव्ह असेल तर याचा अर्थ असा आहे की त्याला सार्स कोव २ ची लागण झाली. या सर्व्हेमुळे किती टक्के लोकसंख्या व्हायरसच्या संक्रमणात आहे हे माहिती झाले. त्याचसोबत कोणत्या व्यक्तीमध्ये संक्रमणाचा धोका जास्त आहे? कोणत्या भागांना वाचवण्यासाठी उपाययोजना करायला हव्यात? याची माहिती मिळाली.

या सर्व्हेसाठी त्यांनी देशातील ८३ जिल्ह्यांतील २८ हजार ५९५ घरांना भेट दिली आणि २६, ४०० लोकांच्या रक्ताचे नमुने घेतले. या सर्वेक्षणात असे आढळले आहे की, या जिल्ह्यांमधील केवळ ०.७३ टक्के लोकांना संसर्ग झाल्याचे पुरावे आहेत. याचा अर्थ असा की लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम झाला आणि व्हायरसच्या संसर्गाचा गतीनं फैलाव रोखला गेला. याचे दोन पैलू आहेत, एक म्हणजे आताही मोठ्या लोकसंख्येला विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका आहे, परंतु दुसरीकडे सर्वेक्षणात समाविष्ट असलेल्या २६,४०० लोकांपैकी केवळ ०.०८ टक्के लोक मृत्यू झाल्याने दिलासा मिळाला आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

सर्कशीत आता प्राणी नसतात, सर्व जोकर असतात; माजी मुख्यमंत्र्यांचं शरद पवारांना जोरदार प्रत्युत्तर

भारताविरुद्ध चीनचा माईंडगेम! लडाख सीमेवर आणल्या अत्याधुनिक ‘बाहुबली तोफ’

त्या’ १३ तासांत काय घडलं? गर्भवती महिलेच्या पतीने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा थरारक अनुभव!

मुख्यमंत्र्यांनंतर आता ज्योतिरादित्य शिंदेंची ऑडिओ क्लीप व्हायरल; ५० लाख रुपये दिल्याचा संवाद

काँग्रेस आमदारांना जयपुरच्या हॉटेलमध्ये पाठवलं; भाजपा आमिष दाखवत असल्याचा मुख्यमंत्र्यांचा आरोप

Web Title: Coronavirus: India With 0.73% Corona Infected Population Has Lowest Fatality Rates In The World

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.