coronavirus pakistan corona infected patients exceed 300 confirmed 2 deaths SSS | Coronavirus : पाकिस्तानमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 300 वर, दोघांचा मृत्यू

Coronavirus : पाकिस्तानमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 300 वर, दोघांचा मृत्यू

ठळक मुद्देपाकिस्तानमधील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली आहे. कोरोनामुळे पाकिस्तानमध्ये दोघांचा मृत्यू झाला असून 300 हून अधिक लोकांना त्याची लागण.सिंध प्रांतात कोरोनाग्रस्तांची संख्या ही सर्वाधिक असून 208 रुग्ण आढळले.

इस्लामाबाद - जगभरात कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. पाकिस्तानमधील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली आहे. कोरोनामुळे पाकिस्तानमध्ये दोघांचा मृत्यू झाला असून 300 हून अधिक लोकांना त्याची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात कोरोनाग्रस्तांची संख्या ही सर्वाधिक असून 208 रुग्ण आढळले आहेत. तसेच पंजाब प्रांतात 33 आणि बलुचिस्तानमध्ये 23 रुग्ण आढळले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्याकडील गंभीर परिस्थिती पाहता वर्ल्ड बँकेकडे मदत मागितली आहे. 

पाकिस्तान समोर कोरोनाच्या संसर्गानचे मोठे आव्हान उभे केले आहे. 270 सार्वजनिक रुग्णालये आणि लॅबद्वारे कोरोनाचा संसर्ग रोखणे अशक्य आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मास्क, किट्स व इतर आरोग्य सेवेची यंत्रणा आणखी मजबूत करण्यासाठी या निधीची आवश्यकता असल्याचं सरकारने म्हटलं आहे. तसेच 10 ते 20 कोटी डॉलरच्या मदतीसाठी चर्चा सुरू आहे. जागतिक बँकेकडून किमान 14 कोटी डॉलर मिळतील अशी अपेक्षा असल्याची माहिती पाकिस्तान सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

दहशतवाद्यांना पोसण्यासाठी हजारो कोटी रुपये उधळणाऱ्या पाकिस्तानची चांगलीच कोंडी झाली आहे. ही कोंडी दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर कोरोना व्हायरसने केली आहे. जगभरात कोरोनाला रोखण्यासाठी बाजारपेठा, शाळा, मॉल, हॉटेल बंद ठेवण्यात येत असताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तसे करू शकत नसल्याचे म्हटलं आहे. पाश्चिमात्य देशांसारखे शट डाऊन पाकिस्तान करू सकत नाही. शहरे मोठ्या प्रमाणावर बंद करण्याची जोखीम आम्ही घेऊ शकत नाही. येथील परिस्थिती अमेरिका, युरोप सारखी नाहीय. येथे 25 टक्के लोक दारिद्र्यरेषेखालील आहेत. जर शहरे बंद केली तर या लोकांना कोरोनापासून तर वाचवू शकू पण ते उपाशी मरतील, अशी भीती इम्रान खान यांनी व्यक्त केली आहे.

पाकिस्तानमध्ये क्रिकेट स्टेडियम, शाळा, कॉलेज, यूनिवर्सिटी बंद करण्यात आल्या आहेत. अन्य देशांपेक्षा पाकिस्तानला कोरोनाचा धोका सर्वाधिक आहे. कारण या देशाच्या सीमा खुल्या आहेत. कोणीही आत-बाहेर करू शकते. तसेच येथील हॉस्पिटलची अवस्थाही केविलवाणी आहे. हात जोडण्यापेक्षा गळाभेट घेण्यात येथील जनतेला चांगले वाटते. लाखोंच्या संख्येने लोक अशिक्षित आहेत. तसेच देशाची आर्थिक स्थितीही चांगली नाही. या साऱ्यामध्ये अडकल्याने गर्दीची ठिकाणे बंद करण्यात येणार नाहीत.

महत्त्वाच्या बातम्या 

Coronavirus : देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली; जाणून घ्या कोणत्या राज्यात किती रुग्ण?

Coronavirus : 'राहुल गांधींनी कार्टून चॅनलऐवजी न्यूज चॅनल पाहावं'

Coronavirus: हाहाकार! इटलीमध्ये 24 तासांत 475 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू; विद्यार्थी बनले डॉक्टर

मुंबईत दोन महिलांना कोरोनाची लागण; महाराष्ट्रात आकडा वाढला

कच्च्या तेलाने गाठला तब्बल 16 वर्षांपूर्वीचा निचांक; मुंबईतील आजचे दर पाहा

 

Web Title: coronavirus pakistan corona infected patients exceed 300 confirmed 2 deaths SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.