शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
3
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
4
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
5
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
6
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
7
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
8
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
9
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
10
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
11
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
12
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
13
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
14
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
15
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
16
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
17
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
18
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?
19
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

Coronavirus : कोरोनाची लढाई जिंकले, 1 लाख लोक बरे होऊन घरी परतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 15:43 IST

Coronavirus : जगभरातील विविध रुग्णालयात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 जगभरात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 18,944 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 425,325 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. कोरोना व्हायरसच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहेत. तसेच कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाग्रस्तांचा आकडा हा वाढत असला तरी याच दरम्यान काही दिलासादायक बातम्याही समोर आल्या आहेत. अनेक लोकांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. तसेच काही रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.

जगभरातील विविध रुग्णालयात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील तब्बल 109,225 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. म्हणजेच एक लाखांहून अधिक लोक बरे होऊन घरी परतल्याची माहिती मिळत आहे.जागतिक महामारी बनलेल्या कोरोनामुळे इटलीत हाहाकार माजला आहे. चीननंतर कोरोनाचा सर्वाधिक फटका इटलीला बसला आहे. आतापर्यंत इटलीतहजारांहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे.इटलीत69,176 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र त्यापैकी 8,326 लोक बरे झाले आहेत. अनेक ठिकाणी लोकांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच याचदरम्यान रुग्ण बरे होण्याच्या संख्येतही वाढ होत आहे.  

अनेक देश कोरोनाच्या गंभीर समस्येचा सामना करत आहेत. कोरोनानं भारतातही आतापर्यंत 11 जणांचा जीव गेला असून, काही जण कोरोना बाधित असलेले सापडत आहेत. मंगळवारच्या आलेखावर नजर टाकल्यास एक चांगली बातमी समोर आली आहे. मंगळवारी 64 नवे रुग्ण सापडले होते, ते सोमवारच्या तुलनेत फारच कमी होते. सोमवारी जवळपास 99 रुग्ण समोर आले होते. म्हणजेच कोरोनाच्या रुग्णांमध्ये आधीच्या तुलनेत घसरण होत असल्याचं निदर्शनास येतं आहे आणि ती भारतीयांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतात सध्या कोरोनाबाधितांची संख्या 560 वर गेली आहे.विशेष म्हणजे 48 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून, त्यांची रुग्णालयातूनही मुक्तता करण्यात आली आहे. सोमवारी अशा रुग्णांची संख्या 35 होती, ज्यात वेगानं वाढ  होते आहे. त्यात महाराष्ट्रातल्याही 8 रुग्णांचा समावेश आहे.

 महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : बापरे! …तर भारतात 13 लाख लोकांना होऊ शकतो कोरोना, शास्त्रज्ञांचा इशारा

Coronavirus : पंतप्रधान मोदींनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, खऱ्या हिरोंसाठी केली प्रार्थना

Coronavirus: प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! देशातील रेल्वेसेवा 14 एप्रिलपर्यंत बंद

Coronavirus : कोरोनाचा कहर! जगभरात तब्बल 18,892 लोकांना गमवावा लागला जीव

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndiaभारतItalyइटलीDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल