शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

coronavirus: कोरोनाशी झुंजत असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रकृतीबाबत समोर आली महत्त्वपूर्ण माहिती

By बाळकृष्ण परब | Published: October 03, 2020 10:38 PM

अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

वॉशिंग्टन - अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.कोरोनाशी झुंजत असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रकृतीच्या दृष्टीने पुढचे ४८ तास महत्त्वपूर्ण आहेत, अशी माहिती डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. यासंदर्भातील वृत्त सीएनएन या वृत्तवाहिनीने दिले आहे. 

सहकारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर क्वारंटाईन झालेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल़्ड ट्रम्प, पत्नी मेलानिया यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: ट्विट करत याची माहिती दिली. कोरोनाचा अहवाल आल्यानंतर त्यांनी याची माहिती देत उपचार सुरु केल्याचे म्हटले होते. काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी निवडणूक डिबेट दरम्यान प्रतिस्पर्धी उमेदवार ज्यो बायडन यांच्यावर टीका करताना गरज भासली तरच मास्क घालेन, असे सांगितले होते. तसेच अनेकदा त्यांनी जाहीररित्या मास्क घालणार नाही असे म्हटले होते.कोरोनावरून बायडन यांच्यावर टीकादोन्ही नेत्यांच्या डिबेटवेळी ट्रम्प म्हणाले की, जर आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन असते तर अमेरिकेत आज 20 लाख लोक मृत झाले असते. यावर बायडन यांनी ट्रम्प यांच्यावर पलटवार केला. ट्रम्प यांच्याकडे आताही कोरोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी कोणताही प्लॅन नाहीय, त्यांनी केवळ वाट पाहिली आहे. त्यांच्याकडे पुरेसा पैसा नाही, ज्याचा उपयोग करून लोकांचे प्राण वाचविले जाऊ शकतील. यावेळी ट्रम्प यांनी भारताला चीन आणि रशियाच्या पंक्तीत बसवत त्या देशांप्रमाणे भारतानेही कोरोना मृतांचा आकडा लपविल्याचा आरोप केला होता. भारतावर केले होते आऱोप आरोपमहत्वाचे म्हणजे कोरोना व्हायरस जेव्हा जगभरात पसरू लागला होता तेव्हा ट्रम्प हे निवडणूक पूर्व प्रचारासाठी भारतात आले होते. अमेरिकेतील भारतीयांची मते मिळविण्यासाठी ट्रम्प यांचा हा दौरा होता. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भारतात जेव्हा लॉकडाऊनची गरज होती तेव्हा ट्रम्प यांच्यासाठीच्या प्रचारात व्यस्त असल्याचे आरोप होत आहेत. अशावेळी ट्रम्प यांनी भारतावरच गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली होती.

 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पcorona virusकोरोना वायरस बातम्याUnited Statesअमेरिका