5G टॉवर्समुळे कोरोना व्हायरस पसरतोय? वाचा WHO ने काय सांगितलं...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 11:58 AM2020-07-02T11:58:33+5:302020-07-02T12:05:39+5:30

ब्रिटनच्या टेलिकॉम कंपन्यांनी संयुक्तपणे सांगितलं की, असे दावे निराधार आहेत आणि नुकसान करण्याच्या उद्देशाने करण्यात आले आहेत.

Is coronavirus covid-19 spreading from 5G towers WHO gave this information | 5G टॉवर्समुळे कोरोना व्हायरस पसरतोय? वाचा WHO ने काय सांगितलं...

5G टॉवर्समुळे कोरोना व्हायरस पसरतोय? वाचा WHO ने काय सांगितलं...

Next

(Image Credit : theconversation.com)

जगभरात जसजसं कोरोना व्हायरसचं संक्रमण वाढत आहे. तसतसे वेगवेगळे षडयंत्र असलेल्या थेअरी समोर येत आहेत. अशीच एक थेअरी इंटरनेटच्या विश्वास पसरली आहे की, कोरोना व्हायरसचा प्रसार होण्यात 5G टेक्नॉलॉजीची भूमिका आहे. आता यावर WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने अॅडवायजरी जारी केली आहे.

businesstoday.in ने दिलेल्या वृत्तानुसार, 5G बाबतची ही बाब इतक्या वेगाने पसरली की, ब्रिटनमध्ये तर वोडाफोनच्या एका टॉवरवर एकाने पेट्रोल बॉम्बही फेकला होता. इंटरनेटवर याबाबत जोरदार वाद-विवाद होत आहेत, चर्चा होत आहे. त्यामुळेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला समोर यावं लागलं आहे. ब्रिटनच्या टेलिकॉम कंपन्यांनी संयुक्तपणे सांगितलं की, असे दावे निराधार आहेत आणि नुकसान करण्याच्या उद्देशाने करण्यात आले आहेत.

WHO ने सांगितलं?

WHO ने जारी केलेल्या सूचनेत स्पष्ट करण्यात आलं आहे की, कोरोना व्हायरस रेडिेओ तरंग किंवा मोबाइल नेटवर्कने पसरत नाही. WHO ने सांगितले की, कोरोना व्हायरस अशाही काही देशांमध्ये पसरला आहे जिथे आतापर्यंत 5G नेटवर्क पोहोचलंच नाहीय.

अफवा कशी पसरली?

मुळात  3G आणि 4G च्या तुलनेत 5G टेक्नॉलॉजीसाठी फार मजबूत नेटवर्कची गरज असते. कारण ज्या स्पेक्ट्रम बॅंड मिड बॅंड आणि मिलीमीटर वेव्हचा वापर केला जातो त्यात स्ट्रॉंग फ्रिक्वेंसीची तरंगे असतात. ज्याच्या कव्हरेजसाठी जास्त टॉवर आणि छोट्या छोट्या सेलच्या नेटवर्कची गरज असते.

जर एखाद्या कंपनीने मिलीमीटर वेव्हचा वापर केला तर त्यांना प्रत्येक बेस स्टेशनवर जास्त एंटेन लावण्याची गरज असेल. कन्सल्टन्सी फर्म अर्न्स्ट अॅंड यंगनुसार, 4G च्या तुलनेत 5G मध्ये दर सेलमध्ये 5 ते 10 पटीने जास्त छोट्या सेलची गरज असते. तर जास्त टॉवर, एंटेना आणि छोट्या-छोट्या सेलचा अर्थ हा आहे की, लोकांचा रेडिओ तरंगांशी संपर्कही जास्त होईल.

(Image Credit : www.cnbc.com)

5G टेक्नॉलॉजी नुकसानकारक आहे का?

एका अंदाजानुसार जगभरात यावेळी साधारण 125 टेलीकॉम कंपन्यांनी व्यावसायिक रूपाने 5G टेक्नॉलॉजी सुरू केली आहे. यातील सर्वात जास्त अमेरिकेत आहे. 5G टेक्नॉलॉजीचा आरोग्यावर काय प्रभाव पडतो, याबाबत जगात अनेक रिसर्च केले गेले. WHO आणि अमेरिकेच्या नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या रिसर्चमध्ये सांगण्यात आले की, याने लोकांच्या आरोग्याचं काहीही नुकसान होत नाही. पण काही स्वतंत्र रिसर्चमध्ये याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो असा दावा केला आहे.

दरम्यान, जगभरात अजूनही कोरोना व्हायरसच्या केसेस वाढतच आहेत. त्यामुळे लोकांमध्ये भीतीही वाढत आहे आणि वेगवेगळ्या अफवाही पसरत आहेत. जगभरात कोरोना व्हायरसच्या 1 कोटीपेंक्षा अधिक केसेस समोर आल्या आहेत. ज्यातील 5 लाख लोकांचा मृत्यू झालाय.

CoronaVirus : कोरोना विषाणू होणार 'कन्फ्यूज'; आगळ्या-वेगळ्या कोरोना लसीची चाचणी यशस्वी झाल्याचा दावा

'या' देशात कोरोनाची पहिलीच लाट; कोरोना दीर्घकाळ माणसांची पाठ सोडणार नाही, तज्ज्ञांचा दावा

Web Title: Is coronavirus covid-19 spreading from 5G towers WHO gave this information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.