Coronavirus: या देशातून कोरोनाची साथ पूर्णपणे संपुष्टात, कोरोनाकाळातील सर्व निर्बंध हटवले 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 10:42 AM2021-06-02T10:42:52+5:302021-06-02T10:43:03+5:30

CoronaVirus Positive News: भारतासह अन्य काही देशांमध्ये कोरोनाच्या साथीच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू असताना दुसरीकडे जगातील काही देशांतून दिलासादायक बातम्याही समोर येत आहेत.

Coronavirus: Coronavirus completely removed from Israel, all restrictions on the Coronavir period removed | Coronavirus: या देशातून कोरोनाची साथ पूर्णपणे संपुष्टात, कोरोनाकाळातील सर्व निर्बंध हटवले 

Coronavirus: या देशातून कोरोनाची साथ पूर्णपणे संपुष्टात, कोरोनाकाळातील सर्व निर्बंध हटवले 

Next

तेल अविव - एकीकडे भारतासह अन्य काही देशांमध्ये कोरोनाच्या साथीच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू असताना दुसरीकडे जगातील काही देशांतून दिलासादायक बातम्याही समोर येत आहेत. दुसऱ्या लाटेचा जोरदार फटका बसलेल्या ब्रिटनमध्ये जुलै महिन्यानंतर पहिल्यांदाच एका दिवसात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. तर दुसरीकडे इस्राइलमध्ये तब्बल ८० टक्के प्रौढ नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली असून, त्या माध्यमातून हर्ड इम्युनिटी साध्य करण्यात आली आहे. (Coronavirus completely removed from Israel, all restrictions on the Coronavir period removed, No deaths reported in Britain in one day)

हर्ड इम्युनिटी गाठल्यामुळे इस्राइलमध्ये कोरोनाला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेले उर्वरित निर्बंधही हटवण्यात आले आहेत. आता येथील नागरिकांना रेस्टॉरंट्स, क्रीडास्पर्धा, सिनेमा हॉलमध्ये जाण्यासाठी लस घेतल्याचा पुरावा दाखवावा लागणार नाही. तसेच संपूर्ण देशात लोकांना सभा, मेळावे घेण्याचीही परवानगी देण्यात आली आहे. 

दरम्यान, ब्रिटनमध्ये सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत कोरोनामुळे १ लाख २७ हजार ७८२ जणांचा मृत्यू झाला आहे. इतर युरोपीय देशांच्या तुलनेत हा मोठा आकडा आहे. तसेच देशात आतापर्यंत कोरोनाचे ४४ लाख ९० हजार रुग्ण सापडले आहेत. तसेच येथे डेल्टा व्हेरिएंटचे रुग्णही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. 

कोरोनामुळे मरणाऱ्यांची संख्या आठवड्याच्या अखेरीस कमी असते. त्या दिवसांमध्ये अशा आकड्यांची नोंद घेतली जात नसल्याने असे घडते. दरम्यान ३० जुलैनंतर प्रथमच संपूर्ण ब्रिटनमध्ये एका दिवसात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. याबाबत आरोग्य सचिव मॅट हेनकॉक यांनी सांगितले की, खरोखरच ही चांगली बातमी आहे. याचा अर्थ गतवर्षी डिसेंबरपासून सुरू झालेल्या लसीकरणाचा प्रभाव आता दिसू लागला आहे. मात्र तरीही लोकांनी सावध राहण्याची गरज आहे. आम्ही आतापर्यंत कोरोनाला हरवलेलं नाही, असे त्यांनी सांगितले. 

या वर्षाच्या सुरुवातीला कोरोनामुळे ब्रिटनमध्ये बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. तसेच मृत्यूही मोठ्या प्रमाणात होत होते.  

Web Title: Coronavirus: Coronavirus completely removed from Israel, all restrictions on the Coronavir period removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.