शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

CoronaVirus: गरजूंचा स्वाभिमान जपणाऱ्या फूड बँकची बातच न्यारी; मदतीचा 'जर्मन पॅटर्न' जगात भारी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 3:29 AM

पोट भरायचं तर लाज सोडावी लागेल व मन मारावं लागेल अशा टप्प्यावर उभी ‘हिडन हंगर’ अर्थात दडलेली भूक

जर्मनीसध्या जगभर एक चर्चा आहे की, कोरोना काळात भूकबळी जाता कामा नये. आपल्या देशातही लोक अन्नछत्र उघडत आहेत. भुकेल्यांपर्यंत अन्न पोहोचवत आहेत. काहीजण आपण किती उदार-दानशूर म्हणून केलेल्या अन्नदानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करीत आहेत. मात्र, या साऱ्यात समाधान इतकंच की, कुणी उपाशी राहू नये, याची कळकळ जगभर माणसांमध्ये दिसते.या साऱ्यात एक चर्चा अशीही आहे की, हा कोरोना माणसांना दारिद्र्यरेषेखाली ढकलून जाईल. मध्यम-कनिष्ठ मध्यमवर्गीय माणसं संकोच करतात कुणाकडून काही घेण्यात; मात्र ही आपत्ती अशी आहे की, त्यापैकी अनेकजण हा संकोच सोडून अन्नासाठी रांगेत उभे राहतील. मागास आणि विकसनशील देशांतच नाही तर स्वत:ला श्रीमंत, विकसित म्हणविणाºया देशांतही हे चित्र आता आम होऊ लागलं आहे.काही दिवसांपूर्वीच जर्मनीतला एक फोटो कुणी ट्विट केला आणि तो प्रचंड व्हायरल झाला. रस्त्याच्या कडेला, कपांऊंडवर अन्नाच्या पिशव्या टांगलेल्या आहेत. कुणी जमेल तसं तिथं ठेवून जातं, कुणी हवं ते घेऊन जातं. ना कुणाला दिल्याचा अहंगंड, ना कुणाला घेण्याचा संकोच. त्याचं कौतुकही झालं. विशेषत: आशियाई देशांत राहणाऱ्या माणसांनी या देण्या-घेण्याच्या कृतीचं खूप कौतुक केलं. कारण ‘दाता’ आपल्याकडे देण्यापेक्षा मोठा होता हा अनुभव आहे. असं असलं तरी जर्मनीतही ‘हिडन हंगर’ अशी चर्चा आहेच. म्हणजे वरकरणी भूक दिसत नाही; मात्र एक वर्ग असा, ज्याला दोनवेळच्या जेवणाची चिंता आहेच.ती आजच नाही तर कोरोनापूर्वीच्या काळातही होती; मात्र आता कोरोनाकाळात तिनं पुन्हा उघड डोकं वर काढलं आहे. जर्मनीत फूड बँक आहेत. त्याला जर्मन भाषेत ‘ताफेल’ म्हणतात. साºया जर्मनीत मिळून सुमारे ९३० फूड बँक आहेत. लोक आपलं राहिलेलं अन्न तिथं देतात, फूड बँकसाठी पैसे देतात आणि ज्यांना गरज आहे ते त्या बँकेतून अन्न घेऊन जातात. साधारण कोरोनापूर्व काळात १५ लाख लोकांनाया फूड बँकेचा आधार होता. आता नवीन आकडेवारी उपलब्ध नाही, मात्र, ती संख्या वाढली असण्याची शक्यता आहे.रस्त्याकडेला टांगलेल्या अन्न पिशव्यांची संख्याही बोलकी आहे. त्यात माणसांसाठीचेच अन्न पदार्थ, नाही तर डॉगफुड, औषधं, काही फळं असंही अनेकजण ठेवून जात आहेत. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ४६ वर्षांची लीलीफर कुस सांगते, मी दर गुरुवारी ताफेलला जाऊन अन्न आणते. मी पाच दिवस कसाईखान्यात नोकरी करते; पण माझं भागत नाही. मग मी गुपचूप जाते. माझ्या सहकाऱ्यांना, मित्रांना हे माहिती नाही. कळलं तर ते त्याची गावभर चर्चा करतील अशी भीती वाटते. ओशाळवाणं वाटतं. पण भागत नाही तर काय करू, मी अन्न चोरत नाही, मागत नाही. तिथं उपलब्ध आहे ते घेऊन येते, यात वाईट ते काय?’ लीलीफरसारखे नोकरदार आता वाढले असतील अशी शंका आहे. जे गुपचूप आपल्या गरजा भागवत आहेत, कारण संकोच. लीलीफर एकल माता आहे, घटस्फोटानंतर चार मुलांना ती एकटीनं सांभाळते आहे. जर्मनीतलं हे चित्र आहे. सारं जग या दिशेनं जाईल असं भय आहे. झाकपाक तरी किती काळ करणार, कोरोनानं सारंच आणि साऱ्यांनाच उघडं पाडलं आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या