Coronavirus: लॉकडाऊन काळात लिहिलेल्या वुहानमधील ‘त्या’महिलेच्या डायरीतून चीनचं धक्कादायक सत्य उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 12:23 PM2020-04-24T12:23:55+5:302020-04-24T12:29:35+5:30

ज्या वुहान शहराने जगभरातील अन्य देशांवर संकट उभं केले आहे. त्याठिकाणी ७६ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये ही डायरी लेखिकेने लिहिली आहे.

Coronavirus: Chinese writer faces backlash for 'Wuhan Diary in lockdown pnm | Coronavirus: लॉकडाऊन काळात लिहिलेल्या वुहानमधील ‘त्या’महिलेच्या डायरीतून चीनचं धक्कादायक सत्य उघड

Coronavirus: लॉकडाऊन काळात लिहिलेल्या वुहानमधील ‘त्या’महिलेच्या डायरीतून चीनचं धक्कादायक सत्य उघड

googlenewsNext
ठळक मुद्देलेखिका फँग फँगला जीवे मारण्याची धमकी वुहानमधील लॉकडाऊन काळात तिने लिहिली होती डायरीसत्य जगासमोर येईल या भीतीने चीन देतंय धमकी

नवी दिल्ली –चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगावर एक संकट निर्माण केले आहे. कोरोना व्हायरसबाबत चीन काहीतरी सत्य जगापासून लपवत आहे असा आरोप अमेरिकेसह अन्य देशांनीही केला आहे. कोरोनाबाबत चीनने माहिती का लपवली? त्याची सूचना जगाला का दिली नाही? असे अनेक शंका चीनभोवती पसरल्या आहेत.

चीनच्या अशा वागणुकीमुळे बहुतांश देशाने संताप व्यक्त केला आहे. अमेरिकेने तर कोरोनाला चिनी व्हायरस म्हणूनही संबोधले आहे. त्यामुळे अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध ताणले गेलेत. अशावेळी चीनच्या वुहान शहरात लॉकडाऊन दरम्यान एका महिलेने लिहिलेली डायरी समोर आली आहे. ज्यावेळी चीनच्या वुहान शहरात कोरोना पसरला होता त्यावेळी फॅँग फँग नावाची ही महिला रोज डायरी लिहित होती. यामध्ये वुहानमधील सत्य घटना तिने लिहून ठेवल्या आहेत. त्यात मृत्यू, भीषणता आणि दुख: हे सर्व समोर आलं आहे. सुरुवातीला तिच्या या डायरीचे चीनमधील लोक चाहते झाले होते पण नंतर ही कथा जर्मन आणि इंग्लिश भाषेत आल्यानंतर लोक तिचा तिरस्कार करु लागले. इतकेच नाही तर तिला जीवे मारण्याच्या धमक्याही येऊ लागल्या.

खुद्द चीनकडूनच लेखिका फँग फँगला जीवे मारण्याची धमकी आली. चीनमध्ये घडलेल्या सत्य घटना तिने लिहिल्या हाच तिचा दोष आहे. ज्या वुहान शहराने जगभरातील अन्य देशांवर संकट उभं केले आहे. त्याठिकाणी ७६ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये ही डायरी लेखिकेने लिहिली आहे. फँग फँग यांनी त्यावेळेस वुहानमधील परिस्थिती, चीन प्रशासनाचा प्रताप, रुग्णालयांमधील रूग्णांची दुर्दशा, स्मशानभूमी आणि कब्रस्तानातील शोक याबद्दल लिहिले होते. एवढेच नव्हे तर ही डायरी फक्त लिहिली नाही तर तिने हे ऑनलाईनही केले. त्यामुळे भीतीपोटी चीन आता या महिलेच्या मागे लागला आहे.

Chinese writer faces backlash for

वास्तविक, फॅंग-फॅंगची ही वुहान डायरी जर्मन आणि इंग्रजीमध्ये आली आहे. डायरीच्या ऑनलाईन आवृत्तीत फँग फँगने एकूण ६४ पोस्ट्स टाकल्या आहेत. एका चांगल्या रिपोर्टरसारखं जे काही त्यांनी पाहिले ते लिहिले, जे ऐकले ते त्यांनी लिहिले. जेव्हा जगाला कोरोना नीट माहित नव्हता तेव्हा त्यांनी जगाला डॉक्टरांच्या हवाल्याने सांगितले की, हा आजार संसर्गजन्य आहे.

जर फाँग फाँग यांनी लिहिलेल्या डायरीची काही पाने पाहिली तर १३ फेब्रुवारी रोजी फॅंग-फँगने एका कब्रिस्तानाचा फोटो ठेऊन लिहिलं होतं की, माझ्या एका डॉक्टर मित्राने मला हा फोटो पाठवला होता. याठिकाणी चहुबाजूने मोबाइल फोन विखुरलेले आहेत. या मोबाईलचे एका वेळी कोणी मालक असावेत. जेव्हा चिनी सरकार मृत्यूची संख्या लपवत होता, तेव्हा फॅंग-फँगने उघडकीस आणले की मोबाईल कब्रिस्तानात विखुरलेले आहेत, हे विखुरलेले मोबाईलने अंदाज येतो की, मृत्यू किती वेगाने येत आहे.

Blog: Wuhan Diary Author — There Is No Tension Between Me and the ...

१७ फेब्रुवारीच्या पानावर फॅंग-फँगने लिहिले आहे की, रुग्णालये काही दिवस मृत्यू प्रमाणपत्रांचे वितरण करत राहतील आणि कित्येक मृतदेह रुग्णवाहिन्यांमध्ये स्मशानभूमीत नेले जातील, ही वाहने दिवसात अनेक फेऱ्या मारतात. फॅंग-फॅंगचा हेतू फक्त मृत्यूची गाथा लिहिणे नव्हे. त्यांनी रुग्णालयांच्या दुर्दशाविषयीही लिहिले. रुग्णालयात जागा नाही, डॉक्टर रूग्णांना पाहू शकत नाहीत, कोणालाही कोणाची चिंता नाही. हे सर्व त्यांनी लिहिले

फॅंग-फॅंगने लिहिले त्याप्रमाणेच हे घडले. पाश्चात्य देशांमधील उपग्रह असे सांगत होते की वुहानमध्ये काळे धूर वाढले होते त्यावेळी बरेच मृतदेह जाळण्यात आले होते. उपग्रह हवेत सल्फरचे प्रमाणावरून मृतांचा आकडा किती याचा अंदाज येऊ शकतो. पाश्चात्य देशांमध्ये याबद्दल बरेच काही लिहिले गेले आहे. पण चीनच्या रेकॉर्ड बुकमध्ये मृतांचा आकडा सुमारे ३ हजार ५०० होता. चीनने गेल्या आठवड्यात या आकडेवारीत किंचित सुधारणा केली आहे. वुहान डायरी लेखिका फँग फँगने डोळ्यांनी जे पाहिले ते जगाला सांगितले. त्यावरुन चीन जगापासून सत्य लपवतयं याला दुजोरा मिळत आहे.

Web Title: Coronavirus: Chinese writer faces backlash for 'Wuhan Diary in lockdown pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.