शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
3
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
4
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
5
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
6
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
7
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
8
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
10
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
11
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
12
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
13
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

भारत आमची जागा कधीच घेऊ शकत नाही; कंपन्या बाहेर पडल्यामुळे चीन मोदींवर भडकला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 8:29 AM

दिवसेंदिवस रसातळाला जाणारी अर्थव्यवस्था पाहता भारतही औद्योगिक प्रगती करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

ठळक मुद्देचिनी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समधून भारताच्या अशा प्रयत्नांवर चीननं टीका केली आहे. चीनमधील अनेक कंपन्या आता भारतात मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स सुरू करण्याच्या विचारात आहेत, ज्याने भारताच्या शेजारचा देश असलेला चीन बिथरला आहे. चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने भारताच्या अशा प्रयत्नांवर चिंता व्यक्त केली आहे. भारत कधीही चीनला पर्याय बनू शकत नाही, असाही त्यात उल्लेख केला आहे. 

बीजिंगः जगातील बहुतेक देशांची अर्थव्यवस्था कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे कोलमडली आहे. दिवसेंदिवस रसातळाला जाणारी अर्थव्यवस्था पाहता भारतही औद्योगिक प्रगती करण्यासाठी प्रयत्नशील आहे. उद्योगविश्वात चीनला मागे टाकत ते स्थान मिळवण्याचा भारताचा मानस आहे. त्यावरूनच चीननं आता भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. चिनी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समधून भारताच्या अशा प्रयत्नांवर चीननं टीका केली आहे. चीनमधील अनेक कंपन्या आता भारतात मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स सुरू करण्याच्या विचारात आहेत, ज्याने भारताच्या शेजारचा देश असलेला चीन बिथरला आहे. चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने भारताच्या अशा प्रयत्नांवर चिंता व्यक्त केली आहे. भारत कधीही चीनला पर्याय बनू शकत नाही, असाही त्यात उल्लेख केला आहे. अलीकडेच एका जर्मन शू कंपनीने आपले उत्पादन युनिट चीनमधून भारतातल्या उत्तर प्रदेशमध्ये हलविण्यात येणार असल्याचे सांगितले. तेव्हापासून चीनची चिंता वाढली आहे. त्याचप्रमाणे इतरही अनेक कंपन्या भारतात येण्यास उत्सुक आहेत. याशिवाय अनेक कंपन्या चीनबाहेर जाण्याचा विचार करत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, उत्तर प्रदेशने चीनमधील अशा मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी आर्थिक टास्क फोर्सची स्थापना केली आहे.भारत कधीही यशस्वी होणार नाहीः ग्लोबल टाईम्सएवढे प्रयत्न करूनही कोरोना साथीच्या काळात आर्थिक दबावाच्या पार्श्वभूमीवर चीनला मागे ठेवून भारत जगातील उद्योगविश्वाचा कारखाना होण्याची शक्यता नाही. भारत चीनला मागे टाकण्याच्या मार्गावर आहे, पण ही फक्त देशाप्रति असलेली काही लोकांची विचारसरणी आहे. तो राष्ट्राभिमान आहे, बाकी काही नाही. अशा अभिमानाने आर्थिक बाबींच्या पलीकडे जाऊन आपण सैन्य स्तरापर्यंत पोहोचलो आहोत. ज्यामुळे काही लोकांना वाटतं की आता ते चीनच्या सीमेवरील प्रश्न चुटकीसरशी सोडवतील. चीनचा सामना करू शकतील. असे विचार भारतासाठी निःसंशयपणे धोकादायक आणि दिशाभूल करणारे आहेत. आतापर्यंत चीनच्या सीमा संरक्षण दलांनी सीमा नियंत्रण उपायांना चालना दिली आहे. गॅल्वान व्हॅली भागातील सीमा नियंत्रण परिस्थितीत एकतर्फी बदल करण्याच्या भारताच्या नुकत्याच केलेल्या प्रयत्नाला उत्तर देताना आवश्यक ती पावले उचलली गेली आहेत, असंही या चिनी वृत्तपत्रात लिहिलेलं आहे. चिनी वृत्तपत्र लिहितो की, पाश्चिमात्य माध्यमांनीही यावेळी चीनच्या बाजाराच्या संभाव्यतेची तुलना करून भारताची स्पर्धात्मकता वाढविण्याचा उत्साह दाखविला आहे, ज्यामुळे काही भारतीय वास्तविक परिस्थितीपासून संभ्रमित झाले आहेत. सध्या भारत चीनची जागा घेईल, असा विचारदेखील अकल्पनीय आहे.चीन आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे भारताला औद्योगिक स्तरावर आकर्षित करण्याची संधी मिळेल असे वाटते, पण दक्षिण आशियाई देशांमध्ये त्यांच्या निकृष्ट पायाभूत सुविधांची कमतरता, कुशल कामगार नसणे आणि परकीय गुंतवणुकीच्या कठोर बंधनामुळे अशी संधी मिळणं अवघडच आहे.  भारत पुढील जागतिक कारखाना होण्याचे स्वप्न पाहत आहे आणि मोदी सरकारनेही ‘मेक इन इंडिया’ मोहिमेसारख्या उद्दिष्टांसाठी विविध उपक्रम सुरू केले आहेत, ज्याचा जगावर फारसा परिणाम होऊ शकला नाही. भौगोलिक राजनैतिक पद्धतींमध्ये ड्रॅगन आणि आशियातील हत्ती यांच्यातील लढाई वेगाने विकसित होत आहे, परंतु दोन प्रमुख उदयोन्मुख बाजारपेठा एकत्र येण्याचा मार्ग शोधू शकतील आणि या प्रक्रियेदरम्यान, व्यावहारिकतेसह भारतीय अर्थव्यवस्थेने त्याबद्दल गंभीरपणे विचार करणे आवश्यक असल्याचाही सल्ला ग्लोबल टाइम्सनं दिला आहे. 

हेही वाचा

CoronaVirus: लसीशिवाय 'या' नव्या औषधानं ठीकठाक होतायत कोरोनाचे रुग्ण; चीनच्या प्रयोगशाळेचा दावा

CoronaVirus : लढ्याला यश! दोन औषधांनी ४ दिवसांत ६० कोरोनाबाधित रुग्ण झाले ठणठणीत

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनIndiaभारत