CoronaVirus: धक्कादायक! कोरोनाची रहस्यमय माहिती असलेली चीनमधील प्रसिद्ध 'बॅट वुमन' अचानक गायब
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 14:02 IST2020-05-04T13:18:37+5:302020-05-04T14:02:17+5:30
तिच्याकडे कोरोना व्हायरससंदर्भात इत्थंभूत माहिती होती. चिनी माध्यमांनीच यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

CoronaVirus: धक्कादायक! कोरोनाची रहस्यमय माहिती असलेली चीनमधील प्रसिद्ध 'बॅट वुमन' अचानक गायब
बीजिंग: चीनमध्ये 'बॅट वुमन' या नावाने प्रसिद्ध असलेली वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी (डब्ल्यूआयव्ही)ची वैज्ञानिक रहस्यमय पद्धतीनं गायब झाली आहे. वुहानमधली ती लॅब आणि कोरोना विषाणूविषयी बरीच गुप्त माहिती तिच्याकडे असल्याची चर्चा आहे. कोरोनासंबंधी महत्त्वाची माहिती त्या बॅट वुमनकडे होती. चीनमधील वुहान लॅबमध्ये काम करणारी शी झेंगिल हिला बॅट वूमन म्हटले जाते. वटवाघळांची आवड आणि त्यांच्यावरील संशोधनामुळे तिला हे नाव मिळालं आहे. वटवाघळांमध्ये असलेल्या विषाणूवरही ती संशोधन करत आहे. असं म्हणतात की, वुहानची लॅब आणि कोरोना विषाणूविषयी बरीच गुप्त माहिती तिनं पाश्चिमात्य देशांकडे उघड केली होती. तिच्याकडे कोरोना व्हायरससंदर्भात इत्थंभूत माहिती होती. चिनी माध्यमांनीच यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
बॅट वुमनबद्दल अनेक अफवा
ग्लोबल टाइम्सच्या रिपोर्टनुसार, पाश्चिमात्य देशांकडे कोरोनासंदर्भात माहिती उघड केल्याची ही अफवा पसरल्यानंतर शी झेंगिल हिनं सोशल मीडियावर याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. तिनं चीनच्या सोशल मीडिया वीचॅटवर लिहिले होते की, पाश्चिमात्य देशांना मी माहिती लीक केल्याची अफवा पसरवली गेली आहे. तरीही माझ्या मित्रांचं आणि माझ्या कुटुंबाचं सर्वकाही ठीक सुरू आहे. त्यानंतर तिने जवळपास 9 ताजी छायाचित्रेही पोस्ट केली. कितीही कठीण प्रसंग आले तरी अशी माहिती लीक होणार नाही. आम्ही काहीही चुकीचं केलेलं नाही. विज्ञानावर दृढ विश्वास असल्याने मी असे ठामपणे म्हणू शकते की, एक दिवस सर्व ढग बाजूला सारून सूर्याचा प्रकाश स्पष्टपणे दिसणार आहे.
काय खरंच, बॅट वुमननं लीक केली पाश्चिमात्य देशांकडे माहिती
अशा अफवांमुळे ती त्रासलेली होती. वुहान लॅबच्या शास्त्रज्ञ शी झेंगिल हिनं पॅरिस दूतावासाला कोरोनासंदर्भात काही गुप्त माहिती दिली होती, अशा बातम्याही आंतरराष्ट्रीय मीडियानं दिल्या होत्या. परंतु शी झेंगील सध्या कुठे आहेत हे कोणालाही माहीत नाही. तिच्याबाबत सोशल मीडियावरही अनेक पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प हे सातत्यानं चीननं वुहान लॅबमधूनच कोरोना पसरवल्याचा आरोप करत आहेत. अनेक देशांनी चीनच्या भूमिकेवर संशयही व्यक्त केला आहे.
गेल्या वर्षी डिसेंबरपासून ती बेपत्ता असल्याचं सांगितलं जात आहे. मागील वर्षी डिसेंबरमध्ये प्रथमच या विषाणूचा संसर्ग झाला होता. वुहानमधून तो व्हायरस जगभर पसरला. त्यानंतर आतापर्यंत शी झेंगिलची कोणतीही माहिती मिळालेली नाही. काही अहवालांमध्ये असे म्हटले जात आहे की, चीन सरकारने तिचे तोंड बंद केले आहे, कारण 2 जानेवारीला तिनी कोरोना विषाणूचे जीनोम उघड केले होते. काही अहवालांमध्ये असे म्हटले जात आहे की, तिनी पाश्चिमात्य देशांना यासंदर्भातील माहिती दिली होती.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
फेसबुकनंतर जिओचा आणखी एक मोठा करार; अमेरिकेच्या 'या' कंपनीसोबत मिळवला हात
Coronavirus: पीएम केअर्स फंडाला 151 कोटी देऊ शकता; मग मजुरांकडून तिकिटाचे पैसे का घेता?- राहुल गांधी
Coronavirus: घरी परतणाऱ्या मजुरांचा खर्च उचलणार काँग्रेस, सोनिया गांधींची मोठी घोषणा
Coronavirus: कोरोना लसीच्या आम्ही एकदम जवळ; डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितली 'वेळ'
होय, ते परत येताहेत; पण तिरंग्यात लपेटून; शहीद कर्नल शर्मा यांच्या पत्नीची आर्त भावना
एन्काऊंटरवेळी कर्नलच्या फोनवर दहशतवाद्यांनी म्हटलं अस्सलाम वालेकुम; अन्...