CoronaVirus : 300 killed by rumor; Citizens of 'this' country drank methanol to cure Corona! pda | CoronaVirus : अफवेचे ३०० बळी; कोरोना बरा करण्यासाठी 'या' देशातील नागरिक चक्क मिथेनॉल प्यायले!

CoronaVirus : अफवेचे ३०० बळी; कोरोना बरा करण्यासाठी 'या' देशातील नागरिक चक्क मिथेनॉल प्यायले!

ठळक मुद्दे मिथेनॉल प्यायल्याने १००० हून जास्त लाेक आजारी पडले.मिथेनाॅल प्यायल्याने त्याला आपली नजर गमवावी लागली आहे. इराणमध्ये मिथेनॉल प्यायल्याने कोरोना विषाणूचा संसर्ग होत नाही अशी अफवा

तेहरान - कोरोना विषाणूची भीती जगभर पसरली आहे. इराणमध्येही यामुळे भयंकर विनाश झाला. इराणमध्ये कोरोनाची विषाणूच्या बाधेला लोकं इतके घाबरले आहे की कोणत्याही अफवेवर विश्वास आहेत. एका अफवामुळे इराणमधील लोकांनी मिथेनॉल औषध म्हणून प्यायले, त्यामुळे ३०० हून अधिक लोक मारले गेले आणि सुमारे १००० लोकांना आजारी पडले. इराणमध्ये काेराेनाची आतापर्यंत जवळपास २३७८ जणांचा मृत्यू झाला. 

मिथेनाॅल प्यायल्यामुळे काेराेनाचा विषाणू नष्ट आणि कोरोना बरा हाेताे. कारण त्यामुळे शरीर सॅनिटाइझ हाेते, अशी अफवा देशात पसरल्यानंतर त्यात ३०० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, असे इराणच्या प्रसिद्धी माध्यमात म्हटले आहे. मिथेनॉल प्यायल्याने १००० हून जास्त लाेक आजारी पडले. त्यात एक पाच वर्षीय मुलगाही आहे. मिथेनाॅल प्यायल्याने त्याला आपली नजर गमवावी लागली आहे. त्या मुलाला आई-वडिलांनीच मिथेनाॅल पाजले हाेते.

डेली मेलने इराणी माध्यमांच्या हवाल्यानुसार दिलेल्या अहवालात म्हटले आहे की, इस्लामिक रिपब्लीक ऑफ इराणमध्ये मेथॅनॉल घेतल्यामुळे आतापर्यंत जवळपास 300 लोक मृत झाले आहेत आणि एक हजाराहून अधिक आजारी झाले आहेत, आता येथे बंदी आहे. मोठ्या संख्येने लोकांनी हे का केले हे या अहवालात स्पष्ट केले आहे. खरेतर, इराणमध्ये मिथेनॉल प्यायल्याने कोरोना विषाणूचा संसर्ग होत नाही अशी अफवा पसरल्यानंतर अलीकडच्या काळात लोकांनी मोठ्या प्रमाणात मिथेनॉल सेवन केले. सुरुवातीला मृतांचा आकडा कमी होता. परंतु ताजी आकडेवारी आता 300 वर पोहोचली आहे. तर 1000 हून अधिक लोक आजारी असल्याची नोंद आहे.

कोरोना: ईरान में फैली ऐसी अफवाह, नशीला पदार्थ पीने से 300 लोगों की मौत

इराणच्या वृत्तसंस्था 'इरना' ने एका अहवालात सांगितले आहे की, दक्षिण-पश्चिम प्रांतात खुजस्तान येथे विषारी दारू प्यायल्यामुळे मृतांचा आकडा खूप जास्त आहे. या व्यतिरिक्त उत्तर अलबोर्ज क्षेत्र आणि केरमनशाह येथेही लोकांचा मृत्यू झाला आहे. इराणमध्ये मद्यपान करण्यास बंदी आहे. असे असूनही, केवळ काही गैर-मुस्लिम धार्मिक अल्पसंख्याकांना मद्यपान करण्याची परवानगी आहे. अहवालात असे सांगितले गेले होते की अलबोर्जचे वकील फिर्यादी मोहम्मद अघयारी   यांनी इरना या मीडियाशी बोलताना सांगितले की मृतांनी कोरोना विषाणूची बाधा आपल्याला झाली आहे आणि मिथेनॉल पिऊन आपण बरे होऊ, या भ्रमात त्यांनी मेथेनॉल प्राशन केले .

Web Title: CoronaVirus : 300 killed by rumor; Citizens of 'this' country drank methanol to cure Corona! pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.