शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

CoronaVaccine : रशियाच्या दुसऱ्या कोरोना लशीसंदर्भात राष्ट्रपती पुतिन यांनी दिली आनंदाची बातमी; केला असा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 2:57 PM

यापूर्वी रशियाने तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षण न करताच आपली Sputnik V ही कोरोना लस यशस्वी ठरल्याची घोषणा केली होती. मात्र, जगातील अनेक देशांनी रशियाच्या या लशीवर टीका केली होती. तर जागतीक आरोग्य संघटनेनेही या लशीला मंजूरी दिली नव्हती.

ठळक मुद्देयापूर्वी रशियाने तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षण न करताच आपली Sputnik V ही कोरोना लस यशस्वी ठरल्याची घोषणा केली होती.पुतिन यांनी म्हटले आहे, की सप्टेंबर महिन्यात आणखी एक लस येत आहे. ही लस प्रसिद्ध व्हेक्टर स्टेट रिसर्च सेंटर ऑफ व्हायरॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजीने तयार केली आहे.

मॉस्को -रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी देशीची दुसरी कोरोना लस अत्यंत चांगली असल्याचे म्हटले आहे. पुतिन म्हणाले, रशियाची दुसरी कोरोना लस EpiVacCorona ची स्पर्धा पहिली लस Sputnik V सोबत असेल. एवढेच नाही, तर कोरोना लस बाजारात आणण्यासाठी रशिया जगाला मार्ग दाखवत आहे, असेही पुतिन यांनी म्हटले आहे.

यापूर्वी रशियाने तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षण न करताच आपली Sputnik V ही कोरोना लस यशस्वी ठरल्याची घोषणा केली होती. मात्र, जगातील अनेक देशांनी रशियाच्या या लशीवर टीका केली होती. तर जागतीक आरोग्य संघटनेनेही या लशीला मंजूरी दिली नव्हती.

पुतिन यांनी असेही म्हटले होते, की पहिली लस Sputnik V त्यांच्या मुलीलाही देण्यात आली. मात्र यानंतर, ज्या स्वयंसेवकांना ही लस देण्यात आली, त्यांच्यात अनेक साइड इफेक्ट्स दिसून आल्याचे वृत्तही माध्यमांतून प्रसिद्ध झाले होते. 

पुतिन यांनी म्हटले आहे, की "सप्टेंबर महिन्यात आणखी एक लस येत आहे. ही लस प्रसिद्ध व्हेक्टर स्टेट रिसर्च सेंटर ऑफ व्हायरॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजीने तयार केली आहे." तर वैज्ञानिकांचे म्हणणे आहे, की रशियाच्या दुसऱ्या कोरोना लशीमुळेही स्नायूंना वेदनांचा सामना करावा लागू शकतो. 

पुतिन म्हणाले, व्हेक्टर इंस्टिट्यूटच्या तज्ज्ञांनी एक चांगली लस तयार केली आहे. ही लस लोकांसाठी अत्यंत उपयोगी ठरेल, याचा मला पूर्ण विश्वास आहे. रशियाची पहिली लस गमालेया नॅशनल रिसर्च सेंटर फॉर अॅपिडेमिलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीने तयार केली होती.

20 देशांकडून लशींची ऑर्डर - तत्पूर्वी, पहिल्या कोरोना लशीची घोषणा केल्यानंतर आपल्याला 20 देशांकडून लशीसाठी मोठ्या ऑर्डर्सदेखील मिळाल्या असल्याचा दावा रशियाने केला आहे. तसेच रशिया शिवाय, भारत, अमेरिका, इग्लंड आणि चीन हे देशही करोनावरील लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. या देशांच्या लशींचेही तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षण सुरू आहे.

रशियात पुढच्या महिन्यात लसीकरण सुरू होण्याची शक्यता -गमलेया रिसर्च सेंटरचे निर्देशक अलेक्झँडर गिंट्सबर्ग यांनी नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या महिन्यात सप्टेंबरमध्ये 15 ते 20 तारखेदरम्यान देशात लसीकरणाला सुरूवात करण्यात येणार आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या लशीची दोन भागांत विभागणी केली जाणार आहे. साधारणपणे 15 ते 20 सप्टेंबरपर्यंत चाचणी पूर्ण होऊ शकते. रशियाच्या आरडीआईएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरिल दिमित्रेव यांनी दिलेल्या माहितीनुसार स्पुतनिक-व्ही ही लस शेवटच्या टप्प्यातील चाचणीत आहे. ही लस सुरक्षित आणि प्रभावी ठरत असल्याचा दावा रशियन तज्ज्ञांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

खूशखबर! : स्वस्तात सोनं विकत घेण्याची संधी! पुन्हा सुरू होतेय मोदी सरकारची 'ही' खास योजना

घरमालक अन् भाडेकरूंच्या दादागिरीचे दिवस संपणार! मोदी सरकार एका महिन्यात 'हा' नवा कायदा आणणार

मोठं यश! वैज्ञानिकांनी शोधून काढली कोरोनापासून बचाव करणारी अँटीबॉडी, असं रोखते संक्रमण

खूशखबर! देशात लवकरच स्वस्त होऊ शकतात बाइक्स अन् मोपेड, हे आहे कारण

CoronaVaccine News: जबरदस्त! रशियानं तयार केली दुसरी कोरोना लस, कुठलेही साइड इफेक्‍ट नसल्याचा दावा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याVladimir Putinव्लादिमीर पुतिनrussiaरशिया