शहरं
Join us  
Trending Stories
1
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
2
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
3
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
4
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
5
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
6
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
7
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
8
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
9
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
10
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
11
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
12
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
13
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
15
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
16
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
17
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
18
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
19
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले

कोरोनाचा लपंडाव? दोन पॉझिटिव्ह, दोन निगेटिव्ह; टेस्लाच्या मालकांच्या एकाच दिवशी चार टेस्ट

By हेमंत बावकर | Published: November 13, 2020 4:01 PM

CoronaVirus News: मस्क यांनी गुरुवारी ट्वीट करून सांगितले की, काहीतऱी घोटाळा सुरु आहे. आज माझी चारवेळा कोरोना टेस्ट करण्यात आली.

स्पेसएक्स आणि टेस्लाचे मालक एलन मस्क (Elon Musk) यांनी कोरोना चाचण्यांवर खळबळजनक दावा केला आहे. एकाच दिवशी त्यांनी चार कोरोना टेस्ट केल्या. यापैकी दोन पॉझिटिव्ह तर दोन निगेटिव्ह आल्या आहेत. यावर मस्क यांनी प्रश्न उपस्थित करत काहीतरी गडबड आहे असे म्हटले आहे. एलन मस्क यांनी मार्चमध्ये म्हटले होते की, कोरोनाचा एप्रिलपर्यंत एकही पेशंट अमेरिकेत सापडणार नाही. परंतू कोरोनाचा सर्वाधिक प्रकोप झालेला पहिला देश हा अमेरिका आहे. 

मस्क यांनी गुरुवारी ट्वीट करून सांगितले की, काहीतऱी घोटाळा सुरु आहे. आज माझी चारवेळा कोरोना टेस्ट करण्यात आली. यामध्ये दोन टेस्ट या निगेटिव्ह आल्या, तर दोन पॉझिटिव्ह आल्या आहेत. एकच मशीन, त्याच टेस्ट आणि त्याच नर्स असेही त्यांनी नमूद केले आहे. तसेच त्यांनी ही रॅपिड अँटीजन टेस्ट असल्याचेही म्हटले आहे. या त्यांच्या ट्विटवर एका युजरने यामुळेच अमेरिकेत कोरोना रुग्ण एवढे वाढले का असे विचारले. यावर मस्क यांनी उत्तर देत जे माझ्यासोबत झाले ते इतरांसोबतही होत आहे, असे म्हणत कोरोना चाचणीवरच शंका उपस्थित केली आहे. 

यानंतर मस्क यांनी सांगितले की, दुसऱ्या लॅबमधूनही पॉलिमरीज टेन रिअॅक्शन टेस्ट करण्यात आली आहे. या टेस्टचा रिझल्ट येण्यासाठी 24 तास लागणार आहेत. एका ट्विटर युजरने त्यांना कोणती लक्षणे दिसली, असे विचारले. तेव्हा त्यांनी सर्दी, ताप आला होता, मात्र काही संशयास्पद लक्षणे दिसली नाहीत, असे सांगितले. 

रॉयटर्सनुसार मस्क हे Becton Dickinson and Co's च्या रॅपिड अॅक्शन टेस्टबाबत बोलत आहेत. सप्टेंबरमध्ये कंपनीने सांगितले होते की, अमेरिकेच्या नर्सिंग होममधून येत असलेल्या या उलट सुलट प्रकारांचा तपास करत आहे. त्यांचे कोरोना टेस्टिंग इक्विपमेंट चुकीचे रिझल्ट देत आहेत. जगभरात कोरोनाचे रुग्ण 5.26 कोटी झाले असून 1291920 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जगातील सर्वात शक्तीशाली देश अमेरिकेत कोरोना व्हायरस महामारीच्या नव्या लाटेने हाहाकार घातला आहे. तेथे गेल्या 24 तासांत तब्बल दोन लाखहून अधिक कोरोनाबाधित समोर आले आहेत. याच बरोबर आता अमेरिकेतील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 10 कोटी 55 लाख 9 हजार 184वर पोहोचला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाAutomobileवाहनTeslaटेस्ला