Corona virus : माझी प्रतिकारशक्ती 'लय भारी', राष्ट्रपतीच म्हणतायंत मी लस घेणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 09:28 AM2021-10-14T09:28:51+5:302021-10-14T10:06:12+5:30

Corona virus : ब्राझीलचे राष्ट्रपती जैर बोलसोनारो यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना म्हटले की, मी निर्णय घेतला आहे की, मी कोरोना व्हॅक्सीन टोचून घेणार नाही. मी नवीन संशधनांवर नजर ठेवून आहे.

Corona virus : My immune system is heavy, the Brazil President says I will not take the vaccine of corona virus | Corona virus : माझी प्रतिकारशक्ती 'लय भारी', राष्ट्रपतीच म्हणतायंत मी लस घेणार नाही

Corona virus : माझी प्रतिकारशक्ती 'लय भारी', राष्ट्रपतीच म्हणतायंत मी लस घेणार नाही

Next
ठळक मुद्देबोलसोनारो यांना यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. तरीही, आपल्या शरीरात व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती असल्याचा दावा त्यांनी सातत्याने केला आहे

जगभरात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम सुरू असून भारताने लसीकरणात मोठा टप्पा गाठला आहे. नागरिकांनी लस घ्यावी, यासाठी सरकार, प्रशासन आणि सर्वच सामाजिक, राजकीय संघटना पुढाकार घेताना दिसत आहेत. मात्र, ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी लस घेण्यास चक्क नकार दिला आहे. ब्राझीलमधील लस घेणारा मी सर्वात शेटवचा व्यक्ती असेल, असे यापूर्वीच त्यांनी म्हटले होते. मात्र, आता त्यांनी लस घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. 

ब्राझीलचे राष्ट्रपती जैर बोलसोनारो यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना म्हटले की, मी निर्णय घेतला आहे की, मी कोरोना व्हॅक्सीन टोचून घेणार नाही. मी नवीन संशधनांवर नजर ठेवून आहे. माझा रोगप्रतिकार क्षमता चांगली आहे. मग, मी लस का टोचून घेऊ? असा सवालच जैर यांनी विचारला आहे. तसेच, तुम्ही दोन रियाल (ब्राझीलचे चलन) जिंकण्यासाठी 10 रियाल लॉटरीवर खर्च कराल, असंच हे आहे. याचे काहीही महत्त्व नाही, असेही जैर यांनी म्हटले. राष्ट्रपती जैर या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

बोलसोनारो यांना यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. तरीही, आपल्या शरीरात व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती असल्याचा दावा त्यांनी सातत्याने केला आहे. तर, कोरोना लस घेतलेल्यांना देण्यास आलेल्या प्रमाणपत्राचाही ते विरोध करतात, ज्याद्वारे लोकांना पर्यटनस्थळी किंवा सार्वजनिक ठिकाणी जाण्यास परवानगी मिळते. 

माझ्यासाठी स्वतंत्रता प्रत्येक गोष्टीत सर्वप्रथम येते. त्यामुळे, जर एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लस टोचायची नसेल तर हा त्याचा वैयक्तीक अधिकार आहे. दरम्यान, ब्राझीलमध्ये आत्तापर्यंत 21.3 कोटी नागरिकांपैकी 10 कोटी पेक्षा अधिका लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. तर, इतर 5 कोटी लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या 6 लाख रुग्णांचा आकडा पार झाला आहे. अमेरिकेनंतर सर्वाधिक मृत्यू झालेला हा दुसरा देश आहे. 

Web Title: Corona virus : My immune system is heavy, the Brazil President says I will not take the vaccine of corona virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app