Corona vaccine :... म्हणून जॉन्सन अँड जॉन्सनच्या कोरोनावरील लसींचे १.५ कोटी डोस केले नष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 03:37 IST2021-04-02T03:36:04+5:302021-04-02T03:37:52+5:30
Johnson & Johnson vaccines : : एकीकडे मध्यम आणि अल्प उत्पन्न असलेल्या देशांना कोविड-१९ प्रतिबंधक लस मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत असताना जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीच्या लसींचे १.५ कोटी डोस नष्ट करण्यात आले आहेत.

Corona vaccine :... म्हणून जॉन्सन अँड जॉन्सनच्या कोरोनावरील लसींचे १.५ कोटी डोस केले नष्ट
वॉशिंग्टन : एकीकडे मध्यम आणि अल्प उत्पन्न असलेल्या देशांना कोविड-१९ प्रतिबंधक लस मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत असताना जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीच्या लसींचे १.५ कोटी डोस नष्ट करण्यात आले आहेत. (1.5 crore doses of Johnson & Johnson corona vaccines destroyed)
अमेरिकास्थित बाल्टमोर येथील जॉन्सन अँड जॉन्सनच्या कारखान्यातील कामगारांनी जॉन्सन अँड जॉन्सन आणि अॅस्ट्राझेनेका लसीतील घटक एकत्र मिसळल्याने लसींचे १.५ कोटी डोस नष्ट करण्यात आले आहे. अमेरिकेच्या अन्न व औषधी प्रशासनाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांनी ही मानवी चूक असल्याचे म्हटले आहे. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने असा दावा केला की, इर्मजन्ट बायोसोल्यूशन या कंपनीकडून हा कारखाना चालविला जातो.